धक्कादायक..! तुम्ही सुद्धा मॅगी खात असाल तर हे नक्की वाचा..

0

माणसांसारखंच ब्रॅण्डचंही नशीब असतं. माणसाच्या आयुष्यासारखे चढ-उतार उत्पादनंही पाहतात. लोकप्रियतेच्या शिखरावरून एकाच क्षणी बंदीच्या खोल गर्तेत आणि तिथून परत नव्याने स्वत:चे दिमाखदार स्थान पटकावत लोकांच्या मनात घर करून राहणं सोपं नाही. एकाच वेळी खूप लोकप्रियता आणि त्याच वेळी पराकोटीची निंदा या दोन्ही गोष्टी अनुभवणंही सहज नाही. पण हे सारं काही वाटय़ाला येऊनही ब्रॅण्ड म्हणून ठाम उभं राहणं ज्या उत्पादनाला जमलं आहे ते उत्पादन म्हणजे मॅगी. हे नाव इतकं पाश्चिमात्य वळणाचं की भारतीय घरात स्थान मिळवताना संघर्ष नावापासूनच होता तरीही ते भारतात रुळलं. या मॅगीचा प्रवास रोचक आहे.

स्वित्र्झलडमध्ये राहणाऱ्या ज्युलियस मायकल मॅगी यांच्यापासून ही कहाणी सुरू होते. वडिलांच्या मालकीची मिल ज्युलियस चालवू लागले तो काळ औद्योगिक क्रांतीच्या आसपासचा. या मिलमध्ये धान्य-कडधान्यं यांचं पीठ तयार होत असे. या काळात स्त्रिया नव्याने कार्यरत होऊ लागल्या होत्या. आपल्या मिलमध्ये काम करणाऱ्या महिलांकडे पाहता ज्युलियसच्या ध्यानात आले की या स्त्रिया घरच्यांसाठी स्वयंपाक बनवण्यात बहुतांश वेळ खर्च करतात. भविष्यात मोठय़ा प्रमाणावर स्त्रिया घराबाहेर पडणार त्यांना असा एखादा पर्याय देता आला पाहिजे ज्यामुळे कमी खर्चात कमी वेळेत पौष्टिक आहार त्या बनवू शकतील. ज्युलियस यांचा डॉक्टर मित्र फ्रिडोलीन स्कलर याच्या मदतीने त्यांनी याबाबतीत विचार सुरू केला. पीठ उत्पादन तर होत होतेच, पण अन्य पदार्थाचा विचार दोघांनी केला. त्यात काही इन्स्टंट सूप होती.

moneycontrol

मॅगी खाण्याचे तोटे:- मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते, अशी माहिती ओबेसीटी सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली आहे. मॅगी हे आंतरराष्ट्कीय ब्रँड आहे. त्यामुळे त्या स्तरावर उपाययोजना व्हायला हव्ययात, असेही ते म्हणालेत. मॅगी खात असाल तर सावध व्हा. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये अतिरिक्त प्रमाणात शिसे असल्याची कबुली खुद्द ‘नेस्ले’ कंपनीने सर्वोच्च न्यायालयासमोर दिली आहे. त्यावर, शिसे असलेली मॅगी मुलांनी का खावी? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. ग्राहक मंत्रालयाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाअंतर्गत नेस्ले कंपनीवर ‘मॅगी’ संदर्भात दाखल केलेल्या ६४० कोटी रूपयांच्या दाव्याची फाईल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा उघडली आहे. १६ डिसेंबर २०१५ ला सर्वोच्च न्यायालयाने दाव्याच्या सुनावणीला स्थगिती दिली होती.

मॅगीत शिसे असल्याचे जेव्हा समोर आले तेव्हा कंपनीने या वृत्ताचे खंडन केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मॅगीच्या वकिलांनी कंपनीवर असलेल्या आरोपांचा स्वीकार करत यात अतिरिक्त शिसे असल्याचे मान्य केले होते. ‘दोन मिनिटांत तयार’ होते अशी जाहिरात केल्यामुळे अनेक ग्राहक आपली भूक मिटवण्यसाठी हे उत्पादन वापरतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने NCDRC ला पुढची कारवाई करण्यास हिरवा कंदिल दिला आहे.

Share.

Leave A Reply