लग्न होण्यास अडचणी येत असतील तर, हा सोप्पा उपाय करा..!

0

आपल्याकडे अनेक चित्रविचित्र प्रथा आणि परंपरा लांगूनचालन होताना दिसून येते. पण यातील काही प्रथा खरच उपयुक्त असतात. या सर्वामध्ये उपलब्ध असणारी एक प्रथा उपयुक्त असल्याचे बोलले जाते. एक प्रथा जी तुमच्या लग्नाच्या अनेक समस्यांचं निराकरण करू शकते त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ज्योतिष शास्त्रा अनुसार तुमचं लग्न होण्यासाठी गुरु हा फार महत्त्वाचा ग्रह असल्याचे लक्षात येते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह अशुभ स्थानी विराजमान असतो त्यांच्या लग्नात अनेक अडथळे येत राहतात. उज्जैन येथील ज्योतिषाचार्य पंडित प्रवीण द्विवेदी यांच्या अनुसार गुरु या ग्रहाच्या तो शांत करण्यासाठी कुठलाही उपाय अस्तित्वात नाही.

instagram.com

पण जर आम्ही सांगतो तो उपाय तुम्ही करून पाहिलात तर तुम्हाला नक्कीच याचे फायदे होतील. गुरुवार हा गुरूपुष्यामृताच्या शुभयोग आहे. या दिवशी जर तुम्ही पुढील उपाय केले तर तुमच्या लग्नामधील सर्व अडथळे निघून जातील.हे उपाय कुठले याबद्दल जाणून घेऊयात

nutriliving.com

1)गुरुवारी केळीच्या झाडाखाली पिवळा कपडा टाकून देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची स्थापना करावी. आणि जर तुमच्याकडून हे होणार नसेल तर केळाच्या पानावर पण तुम्ही या दोन देवतांच्या प्रतिमा स्थापन करू शकता. 2) गाईच्या दुधाने तुम्ही बृहस्पती व विष्णुजी यांच्या प्रतिमेचा अभिषेक करावा आणि पिवळी फुलं पिवळा चंदन तसेच गुळ आणि हरभऱ्याची डाळ पिवळ्या वस्त्रांमध्ये दोन्ही देवतांना अर्पण करावी.

instagram.com

3) या दोन्ही देवतांना नंतर प्रसाद म्हणून पिवळ्या अन्नपदार्थ आणि पिवळी फळ अर्पण करावीत 4) या प्रकारे पूजा केल्यानंतर देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांची आरती करून त्यांच्यासमोर शुद्ध तुपातील नंदादीप तेवत राहील अशी व्यवस्था करावी. याप्रकारे गुरूपुष्यामृताच्या योगाच्या दिवशी जर तुम्ही पूजा केलेत तर अनेक प्रकारच्या अशोक प्रभावातून तुम्हाला मुक्तता मिळू शकते आणि सोबतच तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील.

Share.

Leave A Reply