खंडेराव महाराज यांची तळीभरणे विषयी माहिती..

0

(श्री खंडोबा षडरात्रोत्सव) (श्री मार्तंडभैरव उत्सव) सध्या खंडोबा षडरात्रोत्सव सुरू आहे. चंपाषष्ठी ला घरोघरी तळी भरतात. तळीभरणे हा एक कुळाचार आहे. ताम्हणामध्ये विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण वर खाली तीन वेळा उचलले जाते तद्नंतर पान ठेवून (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते. देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्या नंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.

तीन वेळा ताम्हण उचलून वरखाली करताना “सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार” असा जयजयकार करतात. मराठी मध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार ‘तळी उचलणे’ हा या आचारा वरूनच आला असावा. मणीसुर आणि मल्लासुर या दैत्यांना मार्तंडदेवाने युध्दात हरवले त्यामुळे त्या देवतेला मल्लहारी (मल्हारी) म्हणतात. या देवाने त्यांचा संहार केल्या नंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच हे प्रतिक म्हणजे तळी भरणे आहे. त्याचा उदो उदो हा हेतु आहे.

facebook.com

खंडोबा महाराज तळी आरती:- बोल खंडेराव महाराज की जय॥ सदानंदाचा येळकोट ॥येळकोट येळकोट जय म ल्हार॥ हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥ भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥ निळा घोडा॥ पाई तोडा॥ कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥ गळयात कंठी॥ मोहन माळा॥ ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥ सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥ देवा ओवाळी ॥ नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार॥ Share करा.. कळू द्या सर्वांना आपले_सण_आपले_उत्सव

Share.

Leave A Reply