रहस्यमय कैलास पर्वत आजपर्यंत कोणीही सर का करू शकले नाही?

0

जगातील सर्वात उंच पर्वत हिमालय, त्यापेक्षा कैलास पर्वत हा 2200 मीटर उंचीने लहान असून सुद्धा कोणीही आज पर्यंत का सर नाही करू शकले. जगभरातील वैज्ञानिकांनी यावर खूप संशोधन केले आहे. आता पर्यंत शेकडो गिर्यारोहकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आले नाही.
कैलास पर्वत हे स्थान हिंदू, जैन, बौद्ध, शीख धर्मीय लोकांसाठी खूप पवित्र स्थान मानले जाते. पुराणांमध्ये सांगितल्या प्रमाणे येथे साक्षात भगवान महादेव निवास करतात. पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आहे, तर दुसरीकडे दक्षिण ध्रुव आहे हिमालय पर्वत हे दोन्ही ध्रुवांच्या मध्यभागी स्थित आहे आणि हिमालयाचा केंद्रबिंदू हा कैलास पर्वत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे पृथ्वीचे केंद्र आहे.
हे असे एक केंद्र आहे ज्याला ऍक्सिस मुंडी म्हणतात. ऍक्सिस मुंडी म्हणजे जगातील खगोलीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुवाचा केंद्र होय. हे आकाश आणि पृथ्वी यांच्यातील केंद्र बिंदू आहे, जेथे दहा दिशा एकत्र मिळतात. रशियन शास्त्रज्ञांच्या मते, ऍक्सिस मुंडी ही अशी जागा आहे जिथे अलौकिक शक्तींचा प्रवाह सुरु असतो. कैलास पर्वत परिसरात 2 सरोवर आहे, मानसरोवर जे कि गोड़ पाण्याचे आहे त्याचा आकार सूर्यासमान आहे आणि दुसरे राक्षस सरोवर जे कि खाऱ्या पाण्याचे आहे, त्याचा आकार चंद्रासमान आहे. हे दोन्ही सरोवर रहस्यमयरित्या एकाच ठिकाणी असून सुद्धा वेगवेगळे गुणधर्म बाळगतात, हे पण एक गूढ आहे कि हे नैसर्गिकरित्या बनले आहे कि मानवनिर्मित आहे.
अजून एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे मानसरोवर परिसरात सतत एक धून ऐकू येते आणि त्याचा आवाज हा डमरू आणि ओंकाराच्या आवाजासोबत मिळता जुळता आहे.

wikipedia
kailashjourneys.com
NirmalaTravels.com
samratholidays.com
Share.

Leave A Reply