ईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी का वाढली पंगत? अभिषेक बच्चनने दिले उत्तर!!

0

होय, ईशा अंबानीच्या लग्नात अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय असे बडेबडे स्टार्स पाहुण्यांना पंगत वाढताना दिसले. पंगत वाढतांनाचे या सेलिब्रिटींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. लोकांनी यावरून सेलिब्रिटींना ट्रोलही केले. मुकेश अंबानीची लेक ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचे शाही लग्न संपले. पण या लग्नाची चर्चा अद्यापही संपलेली नाही. इटली ते उदयपूरपर्यंत या लग्नाचे सेलिब्रेशन झाले. पण या लग्नाचा असा एक व्हिडिओ समोर आला, जो पाहून सगळेच अवाक् झालेत.

होय, ईशा अंबानीच्या लग्नात अमिताभ बच्चन , आमिर खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन , ऐश्वर्या राय असे बडेबडे स्टार्स पाहुण्यांना पंगत वाढताना दिसले. पंगत वाढतांनाचे या सेलिब्रिटींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. लोकांनी यावरून सेलिब्रिटींना ट्रोलही केले. पण कदाचित अभिषेकला हे रूचले नाही. त्यामुळेच त्याने लगेच याबद्दलचा खुलासा केला.

twitter.com

अंबानींच्या लग्नात पापा अमिताभ, आमिर, शाहरूख यांनी पंगतीला का वाढले, याचे कारण त्याने सांगितले. ‘गुजराती लग्नातला हा एक विधी आहे. याला ‘सज्जन घोट’ म्हणतात. यात मुलीकडेच मुलांना स्वत: जेवण वाढतात,’ असे टिष्ट्वट अभिषेकने केले. अभिषेक म्हणतो त्याप्रमाणे त्याने स्वत: शिवाय अमिताभ, ऐश्वर्या, आमिर, शाहरूख यांनी मुलीकडचे या नात्याने मुलाकडच्यांना जेवण वाढले. आहे ना गंमत… गत १२ डिसेंबरला ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचे लग्न झाले. यानंतर या लग्नाच्या रिसेप्शनचा ‘सिलसिला’ सुरु आहे. त्याआधी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची प्री-वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये पार पडली. त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिषेक बच्चन , ऐश्वर्या राय अशा सेलिब्रेटींनी यादरम्यान परफॉर्मन्स केला होता. सलमान देखील एका गाण्यावर थिरकला होता. पण सलमान स्टेजवर परफॉर्मन्स सादर करत असताना मुकेश अंबानीच्या मुलाने एंट्री केली आणि सलमान मागे झाला आणि तो मागे उभा राहून डान्स करू लागला. यावरूनच सलमाननही ट्रोल झाला होता. लोकांनी त्याना ‘बॅकग्राऊंड डान्सर’ म्हणून हिणवले होते.

Share.

Leave A Reply