अतिमहत्त्वाचे.. रेल्वेने प्रवास करतांना घ्यावी ही काळजी..

0

मित्रांनो आपल्या पैकी बऱ्याच जणांना रेल्वेचे काही नियम माहीत नाहीत.. आणि त्यामुळे आपण काही लहान मोठ्या चुका करतो. आणि त्याचमुळे तुम्हाला आज आम्ही असे काही नियम सांगणार आहोत ज्यामुळे निश्चितच तुम्हाला याचा प्रवास करताना फायदा होणार हे निश्चित! तुम्ही जर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जर रेल्वे प्रवास करण्याचं ठरविलं असेल तर.. ही माहिती खास तुमच्या साठी..

१. तुमच तिकीट जर वैटिंग स्टेट वर असेल तर तुम्ही रिजर्वेशन च्या डब्ब्यातून प्रवास नाही करू शकतं.. आणि जर तुम्ही जर 4 जणांचं तिकीट बुक केलंय आणि त्यापैकी २ जणांचं जर कन्फर्म झालं असेल तर वैटिंग वर असलेली दोन व्यक्ती टीसी च्या परवानगी ने कन्फर्म झालेल्या दोघांच्या सीट वर बसून जाऊ शकतात.

२.जर तुम्ही रेल्वे मध्ये रात्री ९ च्या पुढे बसलात आणि सकाळी ६ च्या दरम्यान पोहोचणार असाल तर भारतीय रेल्वे बोर्ड च्या नियमानुसार टीसी रात्री कधीही तुमच्याकडे तिकिट दाखविण्याची मागणी करू शकतो. परंतु जर त्याने एकदा बघितलं तर रात्री कधीही परत एकदा दाखवा अशी मागणी नाही करू शकत.

३. जर तुम्हाला टीसी ने विनातिकीत प्रवास करताना पकडले परंतु तुम्ही जर १८ वर्षपेक्षा कमी वयाचे असाल तर टीसी तुमच्यावर कोणतीही कार्यवाही करू शकत नाही. फक्त तुमच्याकडून तिकिटाचे पैसे आकारण्याचा अधिकार टीसी ला असतो. इतर कोणतीही कार्यवाही तुमच्यावर होऊ शकत नाही.

४. जर रिजर्वेशन केलेल्या व्यक्तीच सामान प्रवास करताना जर चोरी गेलं तर तो व्यक्ती रेल्वे बोर्डाकडे सामान भरपाई ची मागणी करू शकतो. यासाठी प्रवाश्यांना रेल्वे पोलिसांकडे एफआयआर दाखल करावा लागतो. ज्यामध्ये अशी नोंद असते की जर प्रवाश्यांना त्यांचे सामान सहा महिन्यांत मिळाले नाही तर सामानाची एकूण रक्कम रेल्वे बोर्डाला सदर प्रवाश्यास नुकसान भरपाई म्हणून परत द्यावी लागते.

Share.

Leave A Reply