विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी बँकेमध्ये जाऊन शैक्षणिक कर्ज मंजूर करणाऱ्या जिल्हाधिकारी!

0

सोलापुरच्या कन्येचा प्रताप… एखाद्या विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज बँकेतून मिळत नसल्याचे तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणे….. जिल्हाधिकारी यांची गंभीर दखल घेत……. जिल्हाधिकारी चक्क बँकेमध्ये जाऊन त्या विद्यार्थिनीला एका दिवसात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे…… असा प्रसंग एखाद्या चित्रपटातच पाहयाला मिळतो परंतु प्रत्यक्षात असा प्रसंग घडला आहे यावर विश्वास बसणार नाही पण तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व महाराष्ट्राच्या कन्या (सोलापूर जिल्ह्य़ातील माढा. उपळाई बुद्रुक ) रोहिणी भाजीभाकरे या चक्क बँकेमध्ये जाऊन शाहीनबेगे च्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज एका दिवसात मंजूर करतात त्यांच्या या कार्यतत्परतेची तामिळनाडू राज्यात महाराष्ट्राच्या कन्येचा चर्चेचा विषय ठरला असून देशातील पहिली घटना असेल जिल्हाधिकारी स्वतःच बँकेमध्ये जाऊन विद्यार्थिनी शैक्षणिक कर्ज मंजूर करणे होय. .. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या रोहिणी भाजीभाकरे या शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे जाणतात त्यामुळे त्या महिलांच्या शिक्षणासाठी अग्रही असतात यांच्या या कार्यतत्परतेचे चर्चा तामिळनाडू व महाराष्ट्र मध्ये सर्वत्र कौतुकानी केली जात आहे.

तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्य़ातील कन्ननकुरीची एंजलेज यांची मुलगी शाहीनबेगे नमाक्कल जिल्ह्य़ातील तिरूकेंगोड येथील खाजगी दंत महाविद्यालयामध्ये तिसर्‍या वर्षाला शिक्षण घेत असून शिक्षणात हुशार असलेली शाहीनबेगे घरची अर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीचे असल्याने शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी नसल्याने शाहीनबेगे हिने शैक्षणिक कर्जासाठी बँकेकडे फाईल दाखल केली होती परंतु सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही बँक कर्ज देत नसल्याने आपले शिक्षण निम्म्यावर बंद होते काय या विचाराने हताश झाली होती.

thebetterindia.com

अखेर तिने सेलम च्या जिल्हाधिकारी तथा उपळाई बुद्रुक च्या कन्या रोहिणी भाजीभाकरे बिदरी यांची भेट घेऊन खरी परिस्थिती सांगितली मॅडम मला काही करून खूप शिकायचे आहे मला मदत करा अशी भावनिक साद घातली जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे बिदरी निश्चित तुझ्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आश्वासन दिले उद्या बँकेमध्ये जा शाहीनबेगे वाटले जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे या इंडियन बँक शाखा बर्डंड्समध्ये फोन करतील किंवा एखाद्या व्यक्तीला बँकेमध्ये पाठवून सुचना देतील परंतु शाहीनबेगे आईसमवेत बँकेमध्ये आली त्यावेळेस बँकेमध्ये एकच लगबग सुरू होती.

जिल्हाधिकारी मॅडम बँकेमध्ये येणार आहेत काही त्यांच्या कामानिमित्ताने येणार असतील असे वाटले होते पंरतु जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे बँकेमध्ये दाखल होताच कुठे आहे शाहीनबेगे म्हणत पुढे आल्या संबंधित बँक मधील कर्मचार्‍यांना शाहीनबेगे शैक्षणिक कर्ज फाईल पूर्ण आहे कर्ज का मंजूर केले नाही विचारणा करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज आडवनूक करू नका.

thebetterindia.com

सुचना करत शाहीनबेगे हिचे चार लाख रुपयाचे कर्ज मंजुरीचे पत्र स्वत जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांनी शाहीनबेगे हिच्या हातामध्ये देऊन शैक्षणिक कर्ज नियमित हफ्ते फेडून बँकेचा विश्वास व शिक्षणाचे ध्येय प्राप्त कर तसेच भविष्यात एखाद्यी अर्थिक गरीब असलेल्या मुलीला शिक्षणासाठी मदत कर असा सल्ला दिला शाहीनबेगे तीच्या आईला चक्क जिल्हाधिकारी आपल्या शैक्षणिक कर्ज मिळवे म्हणून बँकेत येऊन शैक्षणिक कर्ज मंजूर करतात हे पाहून आनंद अश्रू आनावर झाले त्यावेळेस जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांनी स्वतःच्या हातातील रुमालाने शाहीनबेगे आश्रू पुसून बेस्ट ऑफ लक देऊन व प्रसारमाध्यमांच्या पुढे प्रतिक्रीया व्यक्त करताना भावूक झाल्या होत्या उपस्थित नागरिकांकडून जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांच्या कर्तव्यदक्षते कौतुक करत आहे.

Share.

Leave A Reply