हीरो ने लॉन्च केली इलेक्ट्रिक बाईक, 4 तासात होणार पूर्ण चार्ज…

दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे ऑटो एक्सपो 2020 मध्ये एक धमाकेदार बाइक्स लॉन्च होणार आहे.  हीरो इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक एई -47 लॉन्च केली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर, 3-टायर ची इलेक्ट्रिक ट्राइक देखील लॉन्च केली आहे .

बाईकबद्दल बोलायचे तर त्याचा वेग ताशी 85 किलोमीटर आहे. बाईकमध्ये 3.5kWh च्या लिथियम बॅटरी आहे. कंपनीचा असा दावा आहे की बॅटरी 4 तासात पूर्णपणे चार्ज होईल.

या स्कूटरमध्ये हिरो इलेक्ट्रिकने जीपीआरएस आणि मोबाइल चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. स्कूटरमध्ये अँटी-चोरी स्मार्ट लॉक सिस्टम आहे. हे स्कूटर चोरट्यांपासून सुरक्षित असेल. स्कूटरमध्ये ब्लूटूथ सिस्टम देखील आहे.

ऑटो-एक्सपोमध्ये 3 चाकी ट्रिक एई -3 देखील बाजारात आणली गेली आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी  5 तास लागते. ट्राइक एई -3 वन-टाइम चार्जिंगवर 100 किलोमीटरचा प्रवास करू शकते. त्याचा वेग ताशी ८०  किलोमीटर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *