श्रीगोंदेश्वर महादेव मंदिर येथे होणारा अद्भुत नैसर्गिक सूर्यकिरणाभिषेक अधिक वाचा आणि अवश्य भेट द्या

0

सिन्नर, नाशिक चे वैभव असलेले,दक्षिणेकडील सर्वात भव्य असे असलेले मंदिर म्हणजे गोंदेश्वर मंदिर….
११-१२ व्या शतकातील हे मंदिर भारतीय शिल्प स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
विशेषतः इथे होणारा सूर्यकिरणोत्सव….
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर,नाशिकचे काळाराम मंदिर येथे होणारा किरणोत्सव हा विशिष्ट काळासाठी असतो;परंतु,सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर येथे हा सोहळा दररोज होत असतो. याचा अनुभव घ्यायचा असेल तर सकाळी ६-६:३० वाजता होऊ शकतो. बरोबर सूर्यकिरणे नंदी मंडपाच्या मधून सरळ रेषेत पूर्वद्वारातून गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडतात.पुर्वद्वाराच्या मध्ये नव्याने लावलेल्या आधारशिळेमुळे त्याला अडथळा निर्माण होतो.जर इतिहासाचा विचार केला असता,मंदिर ज्यावेळी सुस्थितीत होते व आधारशिळा नव्हती तेव्हा सूर्यकिरणे पूर्णपणे पडत असेल.
ही सगळी स्थापत्यकलेची जादू आहे.

फोटो क्र.१ व २ मध्ये सूर्योदय झाला आहे व किरणे शिवलिंगाच्या वरील बाजूस स्पर्श करत आहे.

फोटो क्र.३ हा सर्वात महत्त्वाचा आहे,यात संपुर्ण शिवलिंगाला स्पर्श करून किरणाभिषेक करत आहे.

courtesy : whatsapp

whatsapp

 

whatsapp

 

whatsapp

 

Share.

Leave A Reply