हिरव्या गवतावर पायी चालल्याने होतील हे आरोग्य लाभ..!

0

सकाळी-सकाळी दव असताना ओल्या गवतावर चालल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. सकाळचा फेरफटका आरोग्यासाठी खूप फायद्याचा असतोे. हेच जर तुम्ही हिरव्या गवतावर चप्पल न घालता चालले तर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. शारीरिक आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी असे करणे फायद्याचे ठरते. जाणून घेऊया याचे फायदे…

123rf.com

डोळ्यांसाठी चांगले सकाळी-सकाळी दव असताना ओल्या गवतावर चालल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. लागोपाठ काही दिवस अनवाणी हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्यांना लागलेला चष्मा घालण्याची गरज राहणार नाही किंवा चष्म्याचा नंबरही कमी होऊ शकतो. अॅलर्जीसाठी उपयुक्त हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने पायांखालील कोमल पेशींशी संबंधित तंत्रिका मेंदूला आराम पोहोचवतात. काही वेळ गवतावर बसणे, चालणे आणि खेळल्याने अनेक प्रकारची अॅलर्जी आणि शिंकांपासून मुक्ती मिळू शकते.

123rf.com

तणाव कमी होतो गवतावर अनवाणी चालल्याने हळूहळू स्नायूंमधील ताण कमी होतो आणि ते तणावरहित होतात. हिरवळीमध्ये जेवढा जास्त वेळ घालवता येईल तेवढा अधिक तणाव दूर होतो. या ग्रीन थेरपीमुळे मेंदूदेखील सशक्त होतो. मधुमेहींसाठी फायद्याचे हिरव्या गवतावर चालल्याने आणि बसल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. मधुमेह्यांनी नियमितपणे दीर्घ श्वास घेत हिरव्या गवतावर चालल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते. सकाळचा फेरफटला मधुमेहींसाठी खूप फायद्याचा ठरतो.

123rf.com

Share.

Leave A Reply