गॅस बर्नर स्वच्छ ठेवण्याचे हे उपाय आहेत जे तुम्हाला नक्कीच माहित नसणार.

कोणत्याही घरातील स्त्रीला जीला हाऊसवाईफ असे म्हणले जाते  तिचे सर्वस्व म्हणेज  स्वयंपाक  घर.सध्याच्या स्त्रिया नोकरी करत करत घरातीलहि कामे सांभाळतात, त्याच्यामुळे आता त्यांचे आयुष्य चूल आणि मुल इतकाच मर्यादित राहिले नाही. म्हणून स्त्रिया स्वयंपाक घरात असल्यावर स्वयंपाक घरात जीव येतो.त्यामुळे त्या साफ सफाईची काळजी जशी तिने घ्यायची असते  तशीच ती  जवाबदारी आपली पण असते.कोणाला स्वयंपाक  येवो अथवा न येवो, पण स्वच्छटा  सर्वांनाच जमते.
अजिबात  साफसफाई न करता गॅस भरपूर दिवस वापरला की काय होते ते  वेगाळे  सांगायची गरज नाही.

गॅस बर्नर  काळा दिसू लागतो म्हणजे त्यावर  काजळीनिर्माण होते.त्याचा परिणाम म्हणून गॅस नित चालत नाही.तुमच्यापैकी भरपूर जणांनी हे देखील पहिले असेल की अनेक दिसव स्वच्छ न केलेल्या गॅसवर एखादे भांडे जर ठेवले असेल तर त्याची काजळी त्या भांड्याला लागते.

मग त्या वेळेस गॅस बर्नर  स्वच्छ करण्याची वेळ येते.बहुतेक जर आपल्या परीने गॅस बर्नर  स्वच्छ करतो.पण तुम्हाला गॅस बर्नर  स्वच्छ करण्याची विशिष्ठ पध्दत तुम्हाला अजून माहित नसेल तर चला जाणून घेऊया.

१) गॅस बर्नर स्वच्छ करताना तो अलगद शेगडीपासून वेगळा करावा. हे करण्यापूर्वी सिलेंडर बंद करा.

२) बर्नर च्या वरचे झाकत देखील काढून दूर ठेवा.

३) त्यानंतर गरम पाणी करून थोडासा साबण टाकून पाण्यामध्ये  बुडवून ठेवा.थोडय़ा वेळाने बर्नर भाग पाण्याबाहेर  काढावे आणि  एखादी टोकदार वस्तू  घेऊन त्या सहायाने बनरमधील घाण काढून टाकावी. पाण्यात यासाठी भिजवावे कि  त्यामुळे बर्नरवरील  चीकटपणा लवकर निघून जातो.


4) आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सोडा टाकावा.आणि त्यामध्ये  बर्नरचे भाग सोडून ठेवावेत. आणि नंतर ते भाग स्वच्छपाण्याने धुवून घ्या.


5)  बर्नर चे भाग संपूर्ण स्वच्छ झाले कि मऊ कपड्याने पुसून घ्या.

खायच्या सोड्याने जर  गॅस बर्नर स्वच्छकरणार असाल तर मग पहिले ते  गॅस बर्नर पाण्याने नित धुऊन घ्या, त्यानंतर त्यावर खाण्याच्या सोड्याची पाण्यात मिश्रण करून ते मिश्रण त्या  गॅस बर्नर वर लावावे आणि २० मिनिटे तसेच ठेवा नंतर हलक्या हाताने घासून  गॅस बर्नर साफ करा.तसेच  गॅस बर्नर वर नियमित प्रमाणे व्हिनेगर चा स्प्रे मारल्याने ते लवकर घाण होत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *