‘नाळ’ चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कमाई बघुन तुम्ही आश्चर्यचकित व्हाल ..!

0

‘झी स्टुडिओज’ व नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेल्या, सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकांनी चित्रपटगृहांमध्ये एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. पहिल्या सात दिवसांतच या चित्रपटाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल चौदा कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवणा-या ‘नाळ’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही आपली तुफानी घोडदौड कायम ठेवली असून चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहे.

marathistars.com

सोशल नेटवर्क साइट्सवरूनही चित्रपटाबद्दल, लहानग्या चैतूच्या म्हणजेच श्रीनिवास पोकळेच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. ‘नाळ’ने तब्बल १४ कोटींची कमाई करून ‘सैराट’ पाठोपाठ पहिल्याच आठवडयात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरून एक नवा विक्रम रचला आहे.

Instagram.com

मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. याशिवाय महाराष्ट्रासह हा चित्रपट इतर राज्यातही प्रदर्शित झाला असून, तामिळ आणि मल्याळम भाषिक चित्रपटांची मक्तेदारी असणाऱ्या चेन्नई आणि बेंगळुरू इथं प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचण्यात ‘नाळ’ यशस्वी झाला आहे.

Share.

Leave A Reply