शासनामार्फत विद्यार्थांना मिळणार मोफत बस पास..!

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महसुल व वन विभाग शासन क्र.एससीवाय-2018/प्र.क्र89/म-7, दिनांक 23/10/2018 निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयात दुष्काळ सदुश्य 180 तालुक्यांमधे विविध उपाययोजना व सवलती लागु करण्याबाबत नमुद करण्यात आले आहे. रा.प.मंडळाचे सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने दुष्काळ सदृश्य 180 तालुक्यांमधील शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांना सन 2018-2019 चे उर्वरित शैक्षणिक सत्राकरीता शिक्षणासाठी मोफत पास प्रवास सुविधा उपलब्ध करुण देणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सद्यस्थित रा.प महामंडळाकडून शैक्षणिक,तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थांना शिक्षणासाठी मासिक पास 66.67% सवलत दिली जाते व विद्यार्थांकडून 33.33% एवढी रक्कम वसूल करण्यात येते. उपरोक्त धोरणात्मक निर्णयानुसार शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थांकडून वसुल करण्यात येणारी रक्कम 33.33% सन 2018-2019 च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरीता (माहे.नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारी,फेब्रुवारी,मार्च,एप्रिल) वसूल करण्यात येऊ नये. सदर अटी पुढील प्रमाणे आहे:- 1) ही सवलत शैक्षणिक वर्ष सन 2018-2019 च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकारित (माहे. 15 नोव्हेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019) लागु राहील. 2)सरदरची सवलत केवळ दुष्काळ सदॄश्य 180 तालुक्यांमधील विद्यार्थांकरीता लागु असेल. 3)शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांकडून वसूल करण्यात येणारी 33.33% रक्कम वसुल करण्यात येणार नाही.
4)सदर सवलत केवळ पास नुतनीकरण करणाऱ्या विद्यार्थांसाठी अनुज्ञेय आहे. 5) नव्याने घेण्यात येणाऱ्या पासेस करीता ही सवलत लागु राहणार नाही. 6)सदर सवलत शहरी बस सेवे करीता अनुज्ञेय नाही.

Share.

Leave A Reply