या कंपनीच्या Car वर मिळतेय भरघोस सूट, तब्बल 72,500 रुपयांपर्यंतचा Year End डिस्काउंट…!

0

ऑटो डेस्क सणासुदीच्या काळात कार निर्माता कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि डिस्काउंट दिला होता. काही कारणास्तव दिवाळीच्या डिस्काउंटला मुकला असाल तर सूट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते. फेस्टिव्ह सीजननंतर आता मारुतीने इयर एंड ऑफर सुरू केली आहे. यामुळे तुमची आवडती कार स्वस्तात घरी आणू शकता. देशातील मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या विविध कारवर 72,500 रुपयांपर्यंत भव्य डिस्काउंट देत आहे. मारुती सुझुकीच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट आहे आम्ही आपल्याला सांगत आहोत.

ऑल्टो 800:-  मारुती कंपनीने आपल्या ऑल्टो 800 वर 55,100 रूपयांपर्यंत सवलत देत आहे. यामध्ये 20,000 कॅश डिस्काउंट, 30,000 रूपये एक्सचेंज बोनस आणि 5,100 रूपयांचा कॉर्पोरेट डिस्कांउटचा समावेश आहे.

ऑल्टो के10:- कंपनीने  ऑल्टो 800 ची मोठी बहिण समजली जाणारी ऑल्टो के 10 वर सुद्धा 55,100 रूपयांची सवलत मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. ही सवलत कारच्या व्हेरियंट वर आधारित आहे.

वॅगन आर:-  कंपनीने वॅगनआर वर 70,100 रूपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. पेट्रोल व्हेरियंट वर 30,000 रूपये आणि सीएनजी व्हेरियंटवर 25,000 रूपयांची सवलत मिळत आहे.

auto.ndtv.com

सेलेरियो:- कंपनीने सेलेरियोवर 65,100 रूपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. यामध्ये सुद्धा कॅश डिस्काउंट. एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्कांउटचा समावेश करण्यात आला आहे. कारच्या एएमटी आणि मॅन्युअल व्हेरियंटवर वेगवेगळी सवलत आहे. सेलेरियोच्या एएमटी व्हेरियंटवर 30,000 रूपये, पेट्रोल मॅन्युअलवर 25,000 आणि सीएनजी व्हेरियंटवर 20,000 रूपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच सेलेरियोवर 5,100 रूपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय व्हेरियंटच्या आधारे एक्सचेंज बोनस मिळणार आहे.

इग्निस:- या गाडीवर 50,100 रूपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामध्ये 20,000 रूपये कॅश, 25,000 रूपये एक्सचेंज बोनस आणि 5,100 रूपये कॉर्पोरेट डिस्कांउटचा समावेश आहे

स्विफ्ट:- मारुती सुझुकीची पॉप्युलर कार स्विफ्टवर 52,600 रूपयांची सवलत मिळू शकते. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. कारच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर वेगवेगळी सवलत असणार आहे.

बलेनो:- मारूतीच्या या प्रिमियम हॅचबॅकवर 32,000 रूपयांचा इयर एंड डिस्काउंट प्राप्त करू शकता. यामध्ये 10,000 रूपये कॅश डिस्काउंट, 15,000 रूपये एक्सचेंज बोनस आणि 7,000 रूपयांचा कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे.

auto.ndtv.com

डिझायर:- कंपनीने भारताची बेस्ट सेलिंग कार असणाऱ्या डिझायरवर 72,500 रूपयांपर्यंतची सवलत देत आहे. कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 62,500 रुपयांपर्यंत आणि डिझेल व्हेरियंटवर 72,500 रूपयांची सवलत तुम्ही प्राप्त करू शकता. डिझायरच्या विविध मॉडलवर वेगवेगळा कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

सियाज:- मारुतीने नवीन पेट्रोल इंजिनसह फॅसिलिफ्ट सियाज नुकतीच लाँच केली आहे. कंपनी या प्रिमियम सिडॅनवर 50,000 रूपयांपर्यंत इयर एंड डिस्काउंट देत आहे. यामध्ये 15,000 रूपयांचा कॅश डिस्काउंट. 25,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रूपयांचा कॉर्पोरेट डिस्कांउटचा समावेश आहे.

एस-क्रॉस डेल्टा:- मारुतीच्या या प्रिमियम कारवर 45,000 रुपयांपर्यंतची सवलत प्राप्त करू शकता. यामध्ये 23,000 रुपये कॅश डिस्काउंट, 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनसचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

Share.

Leave A Reply