दिल्ली मध्ये केजरीवाल सरकारने शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा ओळखून या दोन गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे.
तिथल्या सरकारने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे सरकारी शाळांचे रिझल्ट हि खाजगी शाळांपेक्षा चांगले येऊ लागले आहे. एकूण बजेटच्या 26 टक्के खर्च हा शिक्षणावर करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सरकारी शाळांमध्ये स्विमिन्ग पूल, जिम, सलून क्लास, टुरिझम क्लास अश्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षण दिले जाते. जनमानसात असलेली सरकारी शाळांची जुनाट कल्पना मोडीत काढत सरकारी शाळांचे आधुनिक शाळांमध्ये रूपांतर करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. खाजगी शाळांमध्ये हि इतक्या सुविधा सापडणार नाही जितक्या सुविधा सरकारी शाळांमध्ये दिल्या जात आहे, त्यामुळे गरीब श्रीमंत सर्वच स्तरातील मुलांचा कल हा सरकारी शाळांकडे वाढत आहे.