दिल्ली सरकारने घेतला दिल्लीकरांसाठी महत्वाकांक्षी निर्णय, इतर सरकार कधी घेणार..

0

दिल्ली सरकारने दिल्लीकरांसाठी घरपोच सेवेचा शुभारंभ केला आहे. जात प्रमाणपत्रासह 40 सेवा आता दिल्लीकरांना घरपोच मिळणार आहे.
ग्राहकांसाठी 1076 हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. फोन केल्यानंतर ग्राहक सेवेकडून डॉक्युमेंट्स ची सर्व माहिती घेतली जाईल आणि अपेक्षित डॉक्युमेंट्स असल्यास ग्राहक सांगतील त्या आठवड्यातील दिवशी सकाळी 8 ते रात्री 9 या दरम्यान मोबाईल सहायक घरी येईल आणि डॉक्युमेंट्स व फोटो मशीन मध्ये अपलोड केले जातील. या सुविधा देण्यासाठी व्हीएफएस ग्लोबल या कंपनी ला 3 वर्षासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. प्रत्येक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 50 रुपये इतकी फी आकारली जाणार आहे. यात जात प्रमाणपत्र, जन्माचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड परिवहन विभागातील कागदपत्रे, महसूल विभागातील दाखले असे सर्व मिळून 40 प्रकारच्या सेवा घरपोच पुरविण्यात येणार आहे.

The Indian express
Share.

Leave A Reply