दिल्ली मध्ये खाजगी वाहनांवर बंदी होण्याची शक्यता, नोव्हेंबर पासून निर्मितीवर पण बंदी !

0

राजधानी दिल्ली येथील वाढत्या प्रदूषणामुळे लोक त्रस्त आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये त्याचे परिणाम अजूनच दिसून येतात. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रदूषणामध्ये काही फरक जाणवला नाही तर खाजगी वाहन वापरावर पूर्णपणे बंदी होण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ पर्यावरण अधिकाऱ्याने सांगितले कि दिल्ली येथील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता, नोव्हेंबर पासून येथील सर्व बांधकामांवर बंदी राहील. सकाळी जॉगिंग करणाऱ्यांपासून ते शाळेत जाणार्यांपर्यंत सर्व लोक हे मास्क चा वापर करत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अजून कडक पावले उचलण्यात येतील.

thewire.com

4 ते 7 नोव्हेंबर दरम्यान सर्व प्लांट्स ज्यामध्ये कोळसा किंवा बायोमास चा इंधन म्हणून वापर केला जातो ते बंद असतील. याशिवाय वृत्तपत्रांद्वारे लोकांना आवाहन केले जाईल की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, जनतेच्या नियम आणि दंडांबद्दल जनतेला कळविण्यात येईल. ईपीसीएचे अध्यक्ष भुरेलाल म्हणाले की आम्ही दिल्ली आणि एनसीआरमध्ये बांधकाम थांबवले आहे. हे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. जो कोणी कायद्याचे पालन करीत नाही त्याला शिक्षा होईल. ते म्हणाले की गाड्यांपेक्षा आयुष्य जास्त महत्वाचे आहे. लोकांनी जगण्यासाठी खाजगी वाहनांचा त्याग करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला हवा. त्यांनी सांगितले की जर आवश्यक असेल तर आम्ही खाजगी गाड्यांना बंदी घालू.

Share.

Leave A Reply