आहे का कुणाची हिम्मत महाराष्ट्रात, असा बोर्ड प्रत्येक हॉस्पिटल मध्ये लावण्याची ?

0

सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पोस्टर्स द्वारे हॉस्पिटलमधील सुविधांबाबत नागरिकांना जागरूक करत आहे. दिल्ली येथे प्रत्येक सरकारी हॉस्पिटल मध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात येत आहे. तसेच ते यामध्ये लोकांना आवाहन करत आहे कि या हॉस्पिटलमध्ये सर्व औषधे आणि टेस्ट मोफत आहे. जर तुम्हाला कुठले औषध नसेल मिळत तर 1031 या नंबर वर संपर्क करा, आम्ही आपल्याला ते औषध मिळवून देऊ. या हॉस्पिटल मध्ये जर तुमची एखादी टेस्ट होत नसेल तर डॉक्टर कडून एक फॉर्म भरून घ्या आणि तो फॉर्म कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवून तुम्ही ती टेस्ट फ्री मध्ये करू शकता. जर आपल्याला आपल्या ऑपरेशन ची तारीख 30 दिवसाच्या आत मिळत नसेल तर डॉक्टरांकडून एक फॉर्म भरून घ्या आणि तो फॉर्म कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवून आपले ऑपरेशन मोफत करून घ्या.

whatsapp

अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम दिल्ली सरकार तर्फे राबवण्यात येत आहे. हॉस्पिटल संबंधी कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर 1031 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बऱ्याच वेळेला सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे असून सुद्धा टाळाटाळ केली जाते किंवा इतर टेस्ट केल्या जात नाही त्यामुळे गरीब रुग्णांचा यामुळे नाहक बळी जातो. यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो सोबत सांगण्यात येत आहे कि, आहे का कुणाची हिम्मत इतर राज्यामध्ये असे बोर्ड लावण्याची किंवा अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची.

Prokerala.com

Share.

Leave A Reply