महिलांसाठी घरबसल्या 50 हजार रुपये महिना कमावून देणारा बिजनेस, डे केअर म्हणजेच बाल संगोपन केंद्र !

0

डे केअर म्हणजेच बाल संगोपन केंद्रांची दिवसेंदिवस लहान मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढत चालली आहे. नवतरुण जोडपी तसेच आपल्या घरापासून नोकरीसाठी दूर राहणारी छोटी कुटुंब यांना अशा सेवांची गरज भासते. पती-पत्नी अशा दोघांना दिवसभर ऑफिस साठी बाहेर पडावे लागत असल्यामुळे आपल्या लहान बाळाची किंवा छोट्या मुलांची काळजी घेणे त्यांना अवघड जाते. मग अशावेळेस ते विश्वासू बाल संगोपन केंद्रांचा शोध घेण्यास सुरुवात करतात. याच संधीचे फायदा घेऊन गृहिणी महिला बाल संगोपन केंद्राची सुरुवात करू शकतात व त्यातून चांगले पैसे कमावू शकतात.

colombogazette.com

या बिजनेसमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांचा विश्वास संपादन करणे. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते. जसे कि स्टॅंडर्ड मेन्टेन करणे म्हणजेच साफसफाई राखणे, मुलांची खेळण्याची जागा, मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, त्यांना खाण्यासाठी आरोग्यवर्धक आहार देणे, किचनरूम स्वच्छ ठेवणे, त्यांना दिलेल्या खेळण्यातून त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे आणि त्यांना खेळण्यासाठी जी जागा निवडण्यात आली आहे तिथे मोकळ्या हवेचा संचार असणे आवश्यक आहे. या बिजनेस मध्ये आपण गरजेनुसार बजेट मध्ये वाढ करू शकतो, परंतु तुमचे स्वतःचे घर असल्यास कमीत कमी आपण 50 हजारात हा बिजनेस सुरु करू शकतो.

या बिजनेस मध्ये सुरुवातीच्या काळात तुम्हाला काही वस्तू खरेदीसाठीचा एकदाच खर्च करावा लागतो यामध्ये किड्स फर्निचर, किड्स खेळणी, बुद्धिबळ खेळ, टीव्ही, एसी, फ्रिज, मायक्रोवेव्ह ओव्हन, माहिती चार्ट याला सुमारे पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तुम्ही जर तुमच्या बिजनेस मध्ये वाढ करत असाल तर तुम्हाला सुशिक्षित शिक्षकांची गरज पडू शकते, याची आणि लाईट बिल याची कॉस्ट तुमच्या मासिक खर्चामध्ये असेल. हा बिजनेस सुरु करण्याआधी त्याची नोंद हि म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये करावी लागते. आपल्या बाल संगोपन केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा जरूर बसवून घ्यावा त्यामुळे पालकांचा विश्वास संपादन करण्यास मदत होते, तसेच पालक त्याद्वारे आपले मुलं काय करत आहे हे ऑनलाईन पण मोबाईल द्वारे बघू शकतात.

whatsuplife.in

हा बिजनेस सुरु करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, जसे कि आपल्या जवळ लहान मुलांचा डॉक्टर, डाइटीशन असणे आवश्यक आहे. काही इमर्जन्सी घटने मध्ये ते ताबडतोब येऊ शकतात. तुम्ही लहान मुलांसोबत डील करत आहात, त्यामुळे हे लक्षात ठेवा कि तुम्ही वापरलेल्या फर्निचरमुळे त्यांना खेळताना कुठलीही इजा होऊ नये. आपल्या केंद्राविषयी माहिती देणारे तसेच मुलांना काय काय खायला देणार आहे आणि कुठल्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जाणार याची लिस्ट असलेले मेनू कार्ड बनवून ठेवावे.

Share.

Leave A Reply