खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे नक्की वाचा आणि लाभ घ्या !

0

खजूर हे खूप आजारांवर गुणकारी औषध म्हणून वापरले जाते. हे फळ जास्त महाग नसल्यामुळे सर्व स्तरातील लोक याचा लाभ घेऊ शकतात. खजूर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण फळ मानले जाते, याने तात्काळ ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते. ताजे खजूर हे अतिशय मऊ आणि पचायला हलके असते, त्यामध्ये ग्लुकोज असल्यामुळे त्याने चांगली ऊर्जा मिळते. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी खजूर महत्वाचे मानले जाते, रात्री खजूर भिजत ठेवावे आणि सकाळी खावे यामुळे कमजोर हृदयाला ताकत मिळते. खजुरामध्ये पोटॅशियम असतो, त्यामुळे हृदयाशी निगडित आजार जसे कि स्ट्रोक व इतर आजारांवर फायदेशीर ठरते.

foodandnutrition.org

जेंव्हा आपल्या रक्तातील रेड सेल्स कमी होतात त्यामुळे आपल्याला ऍनिमिया होतो. खजुरात असलेल्या आयर्न च्या भरपूर मात्रेमुळे या रोगावर त्याचा फायदा होतो. तसेच ज्या व्यक्तींचे हिमोग्लोबिन कमी झाले आहे अशा व्यक्तींसाठी हिमोग्लोबिन वाढीसाठी खजूर फायदेशीर ठरते. खजुरात असलेले फायबर्स हे शरीरात खूप सहज विरघळतात त्यामुळे ज्यांना कफ झालेला असेल त्यांनी रात्री पाण्यात खजूर भिजवून ठेवावे आणि सकाळी अनाशापोटी खावे व त्याचे पाणीही प्यावे. कफ बरा होईपर्यंत असे नित्य करावे. वजन वाढीसाठी हे एक उत्तम फळ मानले जाते. यात शुगर, प्रोटीन तसेच भरपूर इतर व्हिटॅमिन्स असतात. आपले वजन कमी असेल आणि आपण कमजोर दिसत असाल तर रोज 4-5 खजूर दुधासोबत खाल्ल्याने आपल्याला लवकरच वजनामध्ये चांगला फरक जाणवेल.

alrai.com

रात्र आंधळेपणात याचा चांगला फायदा होतो, बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळेस दिसण्यास अडचण होते. नियमित खजूर खाल्ल्याने हा आजार बरा होतो. खजुरात असलेल्या A व्हिटॅमिन मुळे आपली दृष्टी सुदृढ राहण्यास मदत होते. बऱ्याच लोकांना कॅल्शिअम च्या कमतरतेमुळे हाडांचे आजार उद्भवतात, हात पाय दुखणे, सांध्यांचे आजार. नियमित खजूर खाल्ल्याने हि समस्या दूर होते. लाल रंगाच्या खजुरामध्ये c व्हिटॅमिन तसेच फ्लॅवोनाईड चे प्रमाण भरपूर असते यामुळे आपली त्वचा मऊ आणि टवटवीत राहण्यास खजुराची मदत होते. खजुरात असलेल्या B व्हिटॅमिन मुळे आपल्या त्वचेवर आलेला रुक्षपना दूर करण्यास मदत होते.

alriyadh.com

Share.

Leave A Reply