दारू प्यायल्यावर माणसाला इंग्रजी का बोलावसे वाटते..!

0

मदिरापान केल्यानंतर पिणाऱ्याच्या वागण्या-बोलण्यात मोठा फरक पडतो हे तर सर्वश्रुत आहे. काही जण बरळायला लागतात, तर काही वेडेवाकडे चाळे करायला लागतात. तुम्हीही हे लक्ष देऊन पाहिले असेल की, दारू प्यायल्यानंतर ज्यांना इंग्रजीचा गंधही नाही अशा व्यक्ती न अडखळता इंग्रजीत बोलायला लागतात. सगळीकडेच येणारा हा अनुभव आहे. परंतु असे का होते, परक्या भाषेत अचानक माणसे बोलू कशी शकतात, यामागचे कारण एका संशोधनाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या रिसर्चनुसार थोडीशी दारू प्यायल्यावर नवी भाषा बोलण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. सायकोफर्माकोलॉजी जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या या रिसर्चमध्ये संशोधकाने 50 विद्यार्थ्यांचे परीक्षण केले. हे सर्व कॉलेज स्टुडंट्स होते. हॉलंडच्या एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांने नुकतीच डच भाषा आत्मसात केली. काहींना पाजली दारू, तर काहींना पाजले पाणी या 50 विद्यार्थ्यांपैकी काही जणांना दारू पाजण्यात आली, तर काहींना साधे पाणी प्यायला देण्यात आले. रिसर्चनुसार एका व्यक्तीसोबत 2 मिनिटे परकीय भाषेत बोलायचे होते, अशा दोन भाषातज्ज्ञांना बोलावले गेले ज्यांना त्या भाषेचे चांगले ज्ञान होते. त्यांना हे सांगितले नव्हते की, कोण दारू प्यायले आहे आणि कोण नाही! वॉल्युंटियर्स सर्वांशी बोलल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला रेटिंग द्यायची होती. ज्यांनी फक्त पाणी पिऊन संवाद साधला, त्यांच्या बोलण्यात कोणताही फरक आढळला नाही. परंतु ज्यांनी थोडीशी दारू प्यायली होती त्यांचे उच्चार आणि फ्ल्यूएन्सी पाणी पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगली होती. दारू पिणाऱ्यांनी परकीय भाषेत अचूक संवाद साधला होता.

तथापि, संशोधकांनी हे मात्र कबूल केले की, जास्त दारू पिण्याचा उलट परिणाम होऊ शकतो. दारू प्यायल्याने जिभेवर नियंत्रण राहत नाही, तो अडखळू लागतो आणि मग अस्खलित बोलणे अवघड होऊन बसते. अति मद्यसेवनामुळे आत्मविश्वासही कमी होतो. बहुतांश वेळा दारू प्यायल्यानंतर परफॉर्मन्सवरही परिणाम पडतो. संशोधकांचे मानणे आहे की, या रिसर्चला दुसऱ्या भाषांबाबतही जोडून पाहिले जाऊ शकते. उदा. एखादा इंग्रजीचा गंध नसणारा, थोडीशी दारू प्यायल्यानंतरही सफाईदारपणे इंग्रजी बोलायला लागतो.

knowyourmems.com

दारु चढल्यावर ची खास वाक्ये १. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही. २.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही.. ३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच. ५. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच. ६. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी ७. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ…. ८. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे…. ९. तुला काय वाटत मला चढली आहे? १०. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे…

knowyourmems.com

११. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार…..१२. मी लास्ट पेग बॉटम अप करणार…. १३. यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है.. १४. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल… १५. कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस… १६. तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है ??? १७.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज.. १८. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का… १९ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है २०. य़ार आता बस ,आत नाही प्यायच… २१. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त… आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि

Share.

Leave A Reply