तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे चमत्कारीक आरोग्यदायी फायदे, वाचा आणि लाभ घ्या !

0

आयुर्वेदानुसार पंचधातूच्या भांड्यात जेवण करण्याचे महत्व सांगितले जाते, तसेच तांब्याच्या भांड्याचेही आपले असे वेगळे वैशिष्ट आहे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आपल्या पचनक्रिया यंत्रणेला मजबूत करते. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी पिल्याने पचनक्रिया सुधारते, याव्यतिरिक्त आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. तांबे म्हणजे कॉपर, साधारणतः आपल्या शरीरातील कॉपर ची कमतरता हे तांबे भरून काढते व बॅक्टरीया पासून आपल्या शरीराचे रक्षण करते.

copperutensilonline.com

अमेरिकन कॅन्सर सोसायटी च्या मते तांब्यामध्ये कँसर विरोधी तत्व असतात. कँसरच्या सुरुवातीच्या काळात कँसर विरुद्ध लढण्यासाठी तांब्याचे गुणधर्म उपयोगी ठरतात. पोटाच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी तांब्याचे पाणी हे बहुउपयोगी मानले जाते, पोट दुखणे, गॅस होणे, ऍसिडिटी आणि कफ या विकारांमध्ये गुणकारी ठरते. शरीराची अंतर्गत शुद्धी तांब्याच्या पाण्याद्वारे केली जाते. तांब्याच्या पाण्याचा त्वचारोगांमध्येही आश्चर्यकारक फायदा होतो, त्वचेवरील पुरळ, डाग, फोड येणे इत्यादी रोग होण्यापासून त्वचेचे रक्षण करते. आजकाल बाजारात विविध ब्रॅण्ड्सचे तांब्याची भांडी उपलब्ध आहे, परंतु त्यामध्ये खरे कोणते आणि खोटे कोणते हे ओळखणे महत्वाचे ठरते.

TastyMatters.com

Share.

Leave A Reply