तुम्ही कोणते कोल्डड्रिंक्स पिता…जाणून घ्या ह्या कोल्ड्रिंक्स पिल्याने काय दुष्परिणाम होतात..!

0

कोल्ड्रिंक पिल्यामुळे तुमची तहान तर भागत नाहीच शिवाय त्यामुळे तुम्हाला ताजेतवानेही वाटणार नाही. कारण यामध्ये शिसे, कॅडमिअम, क्रोमिअम, कार्बनडायआॅक्साईड, शुगर सारखे घातक घटक असतात. उन्हाळ्यात शरीराचे पाणी कमी होत असलाने नेहमी तहान लागते, मग तहान भागविण्यासाठी बहुतांश आपण कोल्ड्रिंक पितो. मात्र ही सवय आपल्या आरोग्याला खूप हानिकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कारण कोल्ड्रिंक पिल्यामुळे तुमची तहान तर भागत नाहीच शिवाय त्यामुळे तुम्हाला ताजेतवानेही वाटणार नाही. कारण यामध्ये शिसे, कॅडमिअम, क्रोमिअम, कार्बनडायआॅक्साईड, शुगर सारखे घातक घटक असतात. कोल्ड्रिंक पिल्याने काय होते. नुकसान लठ्ठपणाआपण जर सतत कोल्ड्रिंक पित असाल तर आपणास लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. कारण कोलामध्ये जास्त प्रमाणात शुगर, फ्रक्टोज सारखे कॅलरी वाढवणारे घटक असतात. त्यामुळे तुमचे वजन वाढून तुम्ही लठ्ठ होऊ शकता. मधुमेह कोलामध्ये असलेल्या कॅलरीजमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

123rf.com

हाडे ठिसूळ होतात कोल्ड्रिंक्स पिल्याने हाडे ठिसूळ होण्याचीही समस्या निर्माण होते. यात असलेले फॉस्फिरिक अ‍ॅसिड कॅल्शिअमचे शोषण थांबवते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. डिहायड्रेशन यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले कॅफिन शरीराला डिहाड्रेट करते. त्यामुळे शरीराचे तेज कमी होते. कॅन्सर अधिक प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्याने कॅन्सरचाही धोका संभवतो. यामध्ये असलेल्या कॅरेमल केमिकलमुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते.

kitaIru.net

यकृतास हानी कोल्यामध्ये असलेले फ्रक्टोज सहजासहजी फॅटमध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे यकृताला हानी पोहोचते. अ‍ॅसिडीटी/अल्सर कोलामध्ये सामान्य पाण्याच्या तुलनेत अ‍ॅसिटीक क्विलिटी असते. त्यामुळे अ‍ॅसिडीटी वाढते व त्यामुळे अल्सरचा त्रास देखील होऊ शकतो. कार्बनडायआॅक्साईड कोल्डड्रिंक फसफसण्यासाठी त्यामध्ये कार्बन डायआॅक्साईड मिसळले जाते जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. व्यसन यामध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या शुगरमुळे मेंदूमध्ये डोपामिन नावाचे केमिकल तयार होते. त्यामुळे या पेयांचे व्यसन लागते.

Share.

Leave A Reply