अशा काही सवयी ज्यामुळे तुम्हाला सतत सर्दी, ताप, खोकला होत असतो, अशा सवयी टाळून तुम्ही निरोगी राहू शकतात.

0

हवामान बदलाच्यावेळी आजारी पडणे किंवा सर्दी, ताप होणे सामान्य आहे, पण बऱ्याच वेळा आपण वर्षातील 10 महिने या आजाराने पीडित असतो. परंतु या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही अशा प्रकारचे आपण एकटे नसून बरेच लोक असे वारंवार आजारी पडतात. पण याला कारण आहे आपल्याला असलेल्या काही चुकीच्या सवयी आणि त्यासोबतच आपण घेत असलेला आहारहि तितकाच या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. सामान्य सर्दी, ताप सहजपणे एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन ने सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 20 सेकंदापर्यंत चांगल्याप्राकारे हात स्वच्छ करणे गरजेचे असते. याव्यतिरिक्त जेवण करण्याआधी, टॉयलेट चा वापर केल्यानंतर, आजारी माणसासोबत वेळ घालवल्यानंतर, कोणीही शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात चांगल्याप्रकारे धुतले पाहिजे. आपण जर असे करत नसाल तर आपल्याला सर्दी ताप होण्याचा धोका अधिक संभवतो.

freepik.es

यात काही शंका नाही कि आपल्याला आजारांचे लवकर संक्रमण होण्यास आपली प्रतिकार शक्तीही तितकीच जबाबदार असते. बऱ्याच व्यक्तींची प्रतिकार शक्ती हि कमजोर असते. त्याला कारण आहे ते घेत असलेला आहार आणि योग्य ती अंग मेहनत न घेण्याची सवय. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे त्यासोबत नियमित व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती योग्य ठेवण्यासाठी पाणीही तितकेच महत्वाचे मानले जाते. आपले शरीर नेहमी हाइड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे योग्य वेळी शरीराची रोजची गरज भागेल इतके पाणी पिणे गरजेचे असते. सतत सर्दी होण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे ऍलर्जी, बऱ्याच लोकांना कुठल्यातरी गोष्टीची ऍलर्जी असते जसे कि धूळ, फुले, थंड पदार्थ इत्यादी. अशावेळी या व्यक्तींनी आपल्याला ऍलर्जी असलेल्या वस्तूंपासून नेहमी दूर राहावे. अशा प्रकारे योग्य ती खबरदारी घेतल्यास आपण सर्दी, ताप या सारख्या संक्रमण रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.

statefarm.com

 

blueribbonnews.com

Share.

Leave A Reply