कर्नाटक येथे दिसला डोक्यावर प्रकाश चमकणारा साप, सर्वजण आश्चर्यचकित, काय आहे या मागचे सत्य जाणून घ्या !

0

कर्नाटक मधील चिकमंगलुरु च्या होलमाकी या गावातील लोकांना एका शेतामध्ये डोक्यावर प्रकाश चमकणारा विचित्र प्रजातीचा साप दिसला तेंव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोब्रा जातीच्या सापाच्या डोक्यावर त्यांना लाल रंगाचा प्रकाश दिसला, त्याला लोक चमत्कार समजू लागले. त्यामुळे तेथे त्या सापाला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि त्या सापाची पूजा करू लागले. सोशल मीडियावरही हा प्रकाश असलेला सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक कुत्रा कोब्रा सापाच्या समोर भुंकताना दिसत आहे आणि त्या सापाच्या डोक्यावर लाल रंगाचा प्रकाश दिसत आहे. असे सांगण्यात येत आहे कि होलमाकी गावातील तरुण अविनाश याच्या कुत्र्याचा शेतामध्ये भुंकण्याचा आवाज येत होता.

Latestly.com

त्यावेळी त्यांना वाटले कि शेतामध्ये एखादे जनावर आल्याने कुत्रा भुंकत आहे. तेंव्हा त्यांनी शेतामध्ये जाऊन बघितल्यानंतर त्यांना दिसले कि कुत्रा डोक्यावर प्रकाश असलेल्या सापावर भुंकत आहे. त्या घटनेचा त्यांनी व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. नंतर सर्प विशेषज्ञांनी चौकशी केल्यानंतर असे समजले कि हा कुठलाही चमत्कार नाही. कुत्रा ज्या वेळेला सापावर भुंकत होता तेव्हा त्यावेळेस सूर्यप्रकाश त्या सापाच्या डोक्यावरून जात असल्यामुळे सापाची त्वचा लाल दिसत होती व ती चमकत होती आणि व्हिडिओ शूट करतांना नेमके तेच कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांनी यावेळी स्पष्ट केली कि डोक्यावर प्रकाश चमकणारा अशा प्रजातीचा कुठलाही साप नाही.

youtube

Share.

Leave A Reply