जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट तयार करणारे :संभाजी महारांजा विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…!

0

१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.

संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे– गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

shivajisambhaji.com

१.जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा २.जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा ३.आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला ४.दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजनकरणारा ५.उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा ६.इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा ७.धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा ८.बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा ९.शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा १०.स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा ११.देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा १२.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा १३.सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा १४.आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा १५.स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा खरा संभाजी….

shivajisambhaji.com

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ‘ तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत. हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे. त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत. जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे. त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं. एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत. पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत. त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी.’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

shivajisambhaji.com

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती.
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। छत्रपती शिवाजी राजे यांचे पुत्र श्री.संभाजी राजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे. तिचे अंकसेवन करणार्यांचा (आधार घेण्यारांचा) पगडा सगळ्यांवर पडेल.

Share.

Leave A Reply