गुजराती बिजनेसमॅन ने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मध्ये चक्क मर्सिडीज कार भेट दिल्या.

0

सुरत चे डायमंड व्यापारी सावजी धनजी ढोलकीया हे नेहमी प्रमाणेच पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेहमी प्रमाणे यावर्षीही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देऊन खुश केले. ढोलकीया यांची हरी कृष्ण एक्स्पोर्ट हि कंपनी असून त्यांचा हिऱ्याचा इम्पोर्ट एक्स्पोर्ट तसेच मॅनुफॅक्चरिंग चा बिजनेस आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनी मध्ये 25 वर्ष पूर्ण केले आणि त्यासोबतच ज्यांचा कामाचा परफॉर्मन्स चांगला आहे अशा कर्मचाऱ्यांना ह्या कार गिफ्ट म्हणून दिल्या. ढोलकीया म्हणाले कि आमचा यामागे उद्देश हाच आहे कि यामुळे आमचे कर्मचारी हे आमच्या कंपनीप्रती प्रामाणिक राहतील आणि कंपनीच्या प्रगतीमध्ये भरपूर योगदान देतील. या कंपनीमध्ये सध्या 6000 कर्मचारी काम करतात, या कंपनीचे वार्षिक उत्पन्न हे 7000 कोटी इतके आहे.

Cartoq.com

Share.

Leave A Reply