सोनाली बेंद्रे, इरफान खाननंतर दिग्गज अभिनेत्रीलाही कॅन्सर!! बघा कोण आहे ती व्यक्ति.!

0

अभिनेता इरफान खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत असताना आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीला या आजाराने घेरले आहे. अभिनेता इरफान खान , अभिनेत्री सोनाली बेंद्रे , अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत असताना आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीला या आजाराने घेरले आहे.

Instagram.com

होय, ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. नफीसा अली यांनी स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली. सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी याबद्दल खुलासा केला. ‘माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीला भेटले. तिने मला कॅन्सरशी लढण्यासाठी शुभेच्छा दिल्यात,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. नफीसा यांचा कॅन्सर थर्ड स्टेजला पोहोचला आहे.नफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे.

Instagram.com

अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. जुनून (1979), मेजर साहब (1998), लाइफ इन अ मेट्रो (2007), यमला पगला दीवाना (2010), गुजारिश (2010) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नफीसा यांनी 1976 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.तर 1977 मध्ये त्या मिस इंटरनेशनलच्या रनरअप राहिल्या होत्या. नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.

Share.

Leave A Reply