भारतातील लोक भूतान येथून स्वस्त पेट्रोल आणतात, यामुळे सरकारला वार्षिक 900 कोटींचा तोटा!

0

भारतीय नॅशनल हायवे -31 हा भूतान पासून फक्त 10 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पश्चिम बंगाल येथील बरचसे लोक या मार्गाने ये जा करतात, यामुळे त्यांना भूतान येथून पेट्रोल व डिझेल भरणे सोप्पे जाते, यामुळे भारताला टॅक्स मधून मिळणारे पैसे मिळत नाही. भूतान मध्ये पेट्रोल हे भारतापेक्षा प्रति लिटर 12 रुपयाने स्वस्त आहे. यामुळे पश्चिम बंगाल येथील पेट्रोलपम्प व्यावसायिकांना वार्षिक 750 कोटींचा तसेच केंद्र सरकारला 176 कोटींचा तोटा होत आहे.

wikipedia.org

भारत- भूतान मैत्री संधी नुसार दोन्ही देशांच्या लोकांना सीमा पार करायला व्हिजाची आवश्यकता नसते, त्यामुळे सीमा ओलांडून पेट्रोल, डिझेल खरेदी करणे गैरन्यायिक नसते. या संधीचा फायदा सीमावर्तीय लोक घेतात. उत्तर बंगाल परिसरात नॅशनल हायवे -31 वर 150 पेट्रोलपम्प आहे. भूतान येथील स्वस्त तेलामुळे तेथील पेट्रोलपंपांना दररोज 20 टक्क्याचे नुकसान होते. 2017-18 च्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटीमधून 2.29 लाख कोटी रूपये कमावले होते. राज्यांनी 1.84 लाख कोटी रुपये कमावले. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येत नाही.

enchantingtravels.com

Share.

Leave A Reply