पोटाची चरबी कमी करण्याचे काही घरघुती उपाय व नित्य सवयी ! जाणून घ्या सविस्तर !

0

बऱ्याच लोकांना एकाचवेळी जास्त अन्न खाण्याची सवय असते. यामुळे पोटाची चरबी वाढते. त्यामुळे जेवण हे दिवसभरात 3 ते 4 वेळा करावे. रोज सकाळी थोडे गरम केलेल्या पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिल्याने चरबी कमी करण्यास चांगला फायदा होतो. यासोबतच शरीराला व्हिटॅमिन्सही मिळतात आणि कॅलरीज कमी होतात. रोज सकाळी पायी चालणे किंवा जॉगिंग करणे पोटाची चरबी कमी करण्यास खुप फायदेशीर असते. बरेच लोक हे त्यांच्या कामामुळे किंवा इतर कारणामुळे जास्त वेळेसाठी एका जागेवर बसून असतात, त्यामुळे त्यांचे शरीर स्थूल होत जाते आणि अशातच पोटाच्या चरबीतही वाढ होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी काही वेळाच्या अंतराने शतपावली करण्याची सवय करावी.

goldcoastfitness.nl

पोटाची चरबी कमी करण्यास योग हे उत्तम मानले जाते. योगामुळे शारीरिक तक्रारींसोबतच मानसिक समस्याही दूर होतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी पादपश्चिमोत्तासन तसेच नौकासन हे उत्तम मानले जाते.यासोबतच इतर आसनांचाहि सराव तुम्ही करू शकता. बऱ्याच लोकांना रात्रीच्या जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असते, परंतु यामुळे शरीराची स्थूलता वाढते. जेवणानंतर नियमित काही वेळानंतर शतपावली करावी व शक्यतो रात्रीचे जेवण हे हलके असावे. रात्री जागरण केल्याने सुद्धा वजन वाढीची समस्या उद्भवते त्यामुळे नियमित 6 ते 8 झोप घेणे महत्वाचे असते. जेवण करताना नेहमी ते व्यवस्थितरित्या चावून खावे त्यामुळे पचनास उशीर लागत नाही. बऱ्याच वेळेला काही लोक हे वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळतात. परंतु त्यामुळे वजन कमी करण्यास फायदा न होता आपले नुकसानच होते. आपले शरीर हे कमजोर होते त्यामुळे सकाळचा नाश्ता हा पोटभर असावा.

gq.com

 

Share.

Leave A Reply