जानेवारी ते मार्च महिन्यात लग्न करण्यास बंदी:- मुख्यमंत्री

0

प्रयागराज येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी नाकारली आहे. या महिन्यात कुणी लग्नासाठी हॉल बुक केला असेल किंवा इतरही बुकिंग केले असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रयागराज सोडून इतर शहरात लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सराकारद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या एकदिवस अगोदर आणि एक दिवसनंतर लग्न सोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून यासंबंधीच्या आदेशाची कॉपी हॉटेलमालक आणि लग्न समारंभासाठी हॉल देणाऱ्या मालकांना देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील वर्षी कुंभमेळ्यात पाच पवित्र स्नान होणार आहेत. पहिले स्नान हे मकर संक्रांतीला तर दुसरे पवित्र स्नान पौष पौर्णिमेला होणार आहे.

Instagram.com

त्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात मौनी आमावस्या, वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमेला होणार आहे. तर मार्च महिन्यात महाशिवरात्री एकादशीला पवित्र स्नान होईल. तर १५ डिसेंबर २०१८ ते १५ मार्च २०१९ या कालावधीत गंगा नदीला स्वच्छ ठेवणे आणि सर्वच चर्म उद्योग बंद ठेवण्याचे आदेशी योगी यांनी दिले आहेत.

Instagram.com

Share.

Leave A Reply