‘या’ लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक..! वाचा सविस्तर

0

आजपर्यंत तुम्ही बादाम खाण्याचे अनेक फायदे ऐकले असाल. मेंदूला तेज ठेवण्यासाठी दररोज सकाळी बदाम खावे असे म्हटले जाते. त्याप्रमाणे अनेक लोक सकाळी बदाम खातातही, तर काही लोक स्वस्थ राहण्यासाठी यास आपल्या डाएटमध्ये समावेश करतात. कारण यामध्ये प्रोटिन, विटामिन आणि मिनरल पुरेशा प्रमाणात असतात. एवढेच नाही तर हे आपल्या त्वचेसाठीसुद्धा खूपच फायदेशीर आहे. परंतु तुम्हांला हे माहित आहे, का काही लोकांना बदामाचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

stylecraze.com

तर जाणून घेऊया कोणत्या लोकांसाठी हे धोकादायक आहे ते. हाय-ब्लड प्रेशरचे रूग्ण ज्या लोकांचे ब्लड प्रेशर हाय आहे त्यांनी बदामाचे सेवन करू नये. कारण या लोकांना नियमितपणे ब्लड प्रेशरची औषधे घ्यायचे असतात. त्यामुळे त्यासोबत बदामाचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. मुतखड्याची समस्या असणारे रूग्णमुतखड्याची समस्या असणारे किंवा गॉल ब्लेडर संबंधित समस्या असणाऱ्या रूग्णांनी बदामापासून दूरच राहावे. कारण यामध्ये ऑक्सलेट अधिक प्रमाणात असते. पचन क्रियासंबंधित समस्या असणाऱ्या लोकांनी ज्या लोकांना पचन क्रियासंबंधित समस्या आहेत त्यांनी बदामाचे सेवन करू नये.

ruchiskitchen.com

यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्याने हे पचन क्रिया संबंधित समस्या आणखी वाढवते. त्याचप्रमाणे अॅसिडिटीची समस्या असेल तरीही बदाम खावू नये. लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्या लोकांनी जे लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांनीही बदाम खावू नये. कारण यामध्ये कॅलरी आणि वसा अधिक प्रमाणात असल्याने ते वजन वाढण्यास मदत करतात. अँटिबायोटिक औषधेजर तुम्ही आरोग्यसंबंधित एखाद्या समस्येसाठी अँटिबायोटिक औषधे घेत असाल तर अशावेळी बदाम खाणे बंद करावे. कारण बदाममध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियमसुद्धा असते. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्याने शरीरावर औषधांचे परिणाम होत नाही.

Share.

Leave A Reply