लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक हे अश्वगंधा चे सेवन करतात, परंतु कुठल्या लोकांनी यापासून दूर राहावे? त्याचे फायदे आणि दुष्परिणाम काय, वाचा सविस्तर !

0

अश्वगंधा एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हि अनेक रोग बरे करण्यासाठी वापरली जाते. प्रत्यक्षात अश्वगंधा एक झुडुप वनस्पती आहे, जी अनेक रोगांकरिता जडी-बुटी चे कार्य करते. सहसा अश्वगंधाचा उपयोग आयुर्वेदिक उपायांमध्ये (अश्वगंध उपचार) शरीराला तरुण ठेवण्यासाठी केला जातो. अश्वगंधा हे एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे, ते म्हणजे लैंगिक शक्ती वाढवणे होय. अश्वगंधाचा लैंगिक कामगिरी सुधारण्यासाठी औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अश्वगंधा हे मधुमेहाची समस्या दूर करण्यास मदत करते. अश्वगंधाच्या फायद्यांसोबतच त्याचे काही मानवी शरीरावर होणारे दुष्परिणामही आहे, फायद्यांसोबतच ते दुष्परिणाम कोणते हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. अश्वगंधाचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते आपल्या शरीरास नुकसानकारक ठरू शकते. प्राकृतिक अश्वगंधा हि गरम असते. म्हणूनच जास्त प्रमाणात वापरल्याने गॅस, मुरुम, उलट्या, अतिसार आणि जास्त झोप यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

healthline.com

ज्या लोकांना लो ब्लड प्रेशर चा त्रास आहे त्यांनी शक्यतो अश्वगंधाचे सेवन करणे टाळावे. यामुळे ब्लड प्रेशर अजून लो होण्याची शक्यता असते. अश्वगंधाच्या जास्त वापराने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. डायबिटीज च्या रुग्णांसाठी अश्वगंधा खूप फायदेशीर असते परंतु तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही अश्वगंधा हे डायबिटीज च्या औषधांसोबत नाही घेत. आपण जर अश्वगंधा हे डायबिटीज च्या औषधांसोबत घेत असाल तर ते आपल्या साठी नुकसानकारक ठरू शकते. आणि ज्या व्यक्तींची शुगर लेवल कमी आहे अशा व्यक्तीने सुद्धा अश्वगंधा घेणे टाळावे. अश्वगंधाच्या पानांचा अत्यधिक वापर आपल्या पोटाला हानिकारक ठरू शकतो. यामुळे आपल्याला पोटातील वेदना, अतिसार, उलट्या, उदर वायूसारख्या समस्या होऊ शकतात. यामुळे अश्वगंधाचे सेवन हे नेहमी योग्य प्रमाणात किंवा शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.

nutritionreview.org

Share.

Leave A Reply