अशी करा महाशिवरात्री ची महादेव प्राचीन पुजा..! ज्याने भगवान शंकर प्रसन्न होतील.

0

आपल्याकडे अशी धारणा आहे की भगवान महादेवाच्या सांगण्यावरून ब्रह्माजिंनी या सृष्टीचे रचना केली, आणि याचं पालन भगवान विष्णू करत असतात. त्यामुळे या धारणेच्या अनुसार महादेव यांचा पुराणांमध्ये महत्त्व अनन्यसाधारण दाखवण्यात आलेल आहे. तुमच्या अनेक समस्यांचे समाधान भगवान महादेव यांच्या साधनेतून मिळू शकत. त्यांची ही साधना पूजा कशी करायची आज आपण बघणार आहोत.

भगवान महादेवांची अनेक रूपे आहेत. या अनेक रूपांना वेगवेगळी नावे आहेत. या सर्व नावांचा एक वेगळाच प्रभाव त्या व्यक्तीच्या आयुष्यभर जाणवतो, जो व्यक्ती रोज या नावांचे स्मरण करतो. या नावांच्या नुसत्या उच्चाराने संसारिक कष्ट आणि मानसिकता तणावांमधून माणूस मुक्त होतो असं महान विद्वानांची भावना आहे. ती नावे तुम्हाला पुराणिक कथांमधून मिळू शकतात.

pixles.com

सोमवारी शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर आपल्या देवपूजेच्या आसनावर बैठक करावी, आणि रुद्राक्षाची माळ हातात घेऊन शिवजींच्या त्या नावांचा जप करण्यास सुरुवात करावी. यामुळे विलक्षण सिद्धी प्राप्त होण्यास मदत होते. हे सर्व मंत्र आपल्या इच्छेनुसार 11 वेळेस 21 वेळेस, 101 वेळेस, किंवा जेवढे आपली इच्छा असेल तेवढा वेळेस करण्यास हरकत नाही. या सर्व मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र हा ओम नमः शिवाय हा समजला जातो. या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला एक मानसिक सुख भेटते.

तुमच्या सर्व समस्या आणि विघ्नांचे हरण होतं यासोबतच नमो नीलकंठय नमः या मंत्राचा ही मनोभावे जप करणे गरजेच आहे. या मंत्रामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अशी धारणा आहे या मंत्रांचा जप करताना साधारण माळ न वापरता रुद्राक्षापासून तयार झालेली माळ वापरणे उचित राहील. जप करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बघून जप केलेलं फलदायी राहील.

india.com

सोमवारी महादेवाची पूजा करताना सकाळी स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर मंदिरात जाऊन भगवान महादेव माता पार्वती यांना पवित्र पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर चंदन तांदूळ आणि बेलपत्र यासोबतच विविध फुलं अर्पित करून मनोभावे दर्शन घ्यावे. दर्शन झाल्यानंतर भगवान महादेवाला तुपाचा आणि साखरेचा प्रसाद दाखवा आणि त्यानंतर धूप आणि अगरबत्तीने आरती करावी.

Share.

Leave A Reply