सैराट फेम ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू चा नवीन चित्रपट येत आहे, बघा कोणता ते !

0

सैराट या चित्रपटातील अभिनयाने मराठी मनावर राज्य करणारी आपल्या सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एक नवीन चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना तिला नवीन चित्रपटात बघण्याची इच्छा होती, ती आता लवकरच पूर्ण होणार आहे. ‘कागर’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु झाले आहे, अकलूज मध्ये नुकतेच या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शॉट चे चित्रीकरण करण्यात आले. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने हे सुद्धा अकलूजचेच रहिवासी आहे, त्यांनी या चित्रपटाच्या चित्रकारणासाठी सुद्धा अकलूज मधला माळशिरस हा तालुका निवडला त्यामुळे प्रेक्षक चांगलेच खुश आहे. चित्रीकरण्याच्या सेट वर रिंकूला बघण्यासाठी प्रेक्षकांची चांगलीच गर्दी होत आहे. चित्रीकरणादरम्यानच एवढी गर्दी होत असेल तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर किती होणार याविषयी चांगलीच चर्चा रंगत आहे.

Nashikites.com

रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेल्या कागर या चित्रपटाविषयी सिनेसृष्टीत सध्या उत्सुकता आहे. कारण, सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या मार्फत रिंकू बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांसमोर आली आहे. उदाहरणार्थ चित्रपट निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कागर चित्रपटात रिंकूचा नायक कोण आहे, हे अजून सांगण्यात आले नाही. रिंकूचा हा नवा चित्रपट कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले आहे.

youtube.com

Share.

Leave A Reply