अनिल कपूर यांच्या संपत्तीचे आकडे पाहून व्हाल थक्क…!

0

जाणून घ्या त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि बरंच काही…. ‘धिना धिन धा….’, असं गाणं वाजू लागल्यानंतर ‘ए जी ओ जी…’ करत समोर येणाऱ्या त्या चेहऱ्याला कोणीही विसरलेलं नाही. चिरतारुण्य म्हणजे नेमकं काय असतं याचच उदाहरण असणारा हा चेहरा म्हणजे अभिनेता अनिल कपूर. आज अनिल कपूर यांचा वाढदिवस. वयाच्या ६२ व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘झक्कास’ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याची संपत्ती आणि वार्षिक उत्पन्नही तितकच झक्कास आहे. आतापर्यंतची त्यांची संपती पाहिली तर हे आकडे जवळपास १२६ कोटी रुपयांच्या घरात आहेत. तर त्यांचं वार्षिक उत्पन्न १० कोटी रुपये इतकं आहे.

संघर्षाच्या काळाचा सामना करत चित्रपट दुनियेत आपलं स्थान प्रस्थापित करणाऱ्या अनिल कपूर यांच्याकडे असणाऱ्या महागड्या कार आणि त्यांचा आलिशान बंगला हासुद्धा चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय आहे. त्यांच्याकडे असणाऱ्य़ा कारपैकी एक म्हणजे Mercedes Benz ML350. या कारची किंमत ही जवळपास ६० लाखांच्या घरात आहे. तर, ‘स्टेटस सिंबल’ म्हणून ओळखल्या जाणारी Mercedes Benz S-Class ही कारही त्यांच्याकडे आहे. या कारची किंमत १.४० कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय बीएमडब्ल्यूची १.२६ कोटी इतकी किंमत असणारी 7 series ही कारही त्यांच्याकडे आहे.

instagram.com

कपूर यांच्याकडे असणाऱ्या आलिशान कारमध्ये लक्ष वेधते, ती म्हणजे २ कोटी रुपयांची Audi RS7. कपूर यांच्याकडे असणाऱ्या कारची रांग ही भलीमोठी आहे. त्यांच्या या राहणीमानातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचा बंगला. बऱ्याच सण- उत्सवांच्या वेळी किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये त्यांच्या या घराची झलक पाहण्यात आली आहे. बऱ्याच संकेतस्थळांवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार कपूर यांच्या या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटींच्या घरात आहे.

Share.

Leave A Reply