आणि या कारणामुळे जेसीबी खूप वायरल झाला..

0

मित्रांनो मागील काही दिवसांपासुन एक हॅशटॅग खूप वायरल होतोय. तो म्हणजे #JCBkikhudai.
जेसीबी म्हणजे तीच मशीन ज्याचा वापर मोठमोठाले गड्डे खोदण्यासाठी होतो. आणि चक्क तीच मशीन सध्या नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचं कारण ठरत आहे. फेसबुक म्हणू नका, व्हाट्सएप म्हणू नका, ट्विटर म्हणू नका.. जवळपास सर्वत्र यावर मिम्स खूप वायरल झाले. चक्क सनी लिओनी ला सुद्धा जेसीबी चा मोह आवरला नाही.

नक्की काय कारण आहे सोशल मीडिया वर जेसीबी व्हायरल होण्या मागे ? मित्रांनो जेसीबी च खोदकाम अर्थात यात माती काढणे ती बाजूला टाकणे परत काढणे टाकणे हे सर्व असत परंतु कोणाला विश्वास हि बसणार नाही कि याच सर्व कामाचे व्हिडिओस सध्या युट्युब वर चक्क लाखोंच्या संख्येने पाहिल्या गेले आहेत. नक्की कोण आहेत हि लोक ! एकतर यातून काही शिकण्यासारखं मिळत नाही किंवा इतर काही मनोरंजन हि नसत, मग नक्की का हि लोक एवढं पाहतात? अहो चक्क काही व्हिडिओस ला तर ३० मिलिअन पर्यंत views आहेत.

तुम्हाला माहित आहे का जेसीबी च्या खोदकामाचा दर ७०० रुपये एका तासाचे एवढा आहे !
मित्रांनो कोणताही जेसीबी मालक तथा चालक दर तासाला तब्बल ७०० रुपये म्हणजे १० तास जरी काम केलं तर जवळजळ ७ हजार रुपये दिवसाला कमवितो म्हणजे एका सरकारी नोकरदारापेक्षा हि जास्त कमाई जेसीबी वाले करतात. आणि म्हणूनच जेसीबी कि खुदाई अर्थात जेसीबी च खोदकाम हे खूप व्हायरल झाल.

Share.

Leave A Reply