अमिताभ बच्चन यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ- वाचा सविस्तर

0

आज भारत देशातील शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहे त्यात कर्जबाजारी झालेल्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना बिग बी भेटणार आहेत. १ हजार ३९८ शेतकऱ्यांचे कर्ज ते स्वतः भरणार आहेत. या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पैसे बँकामध्ये भरुन ते कर्जमुक्त झाल्याचे कागदपत्र घेऊन संबंधित शेतकऱ्यांना अमिताभ भेटणार आहेत. प्रदेशातील ७० शेतकऱ्यांना मुंबईत आणण्याची आणि त्यांच्या कर्ज फेडीचे सर्व व्यवस्था केल्याचे अमिताभच्या खाजगितील व्यक्तीने सांगितले. उत्तर प्रदेशातील एकूण १,३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्ज बिग बी फेडतील. शेतकऱ्यांचे कर्ज चुकवण्यासाठी अमिताभने बँक ऑफ इंडियासोबत वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) करार केला आहे.

deccanchronicle.com

२६ नोव्हेंबर रोजी ते शेतकऱ्यांना भेटतील आणि त्यांना बँकेची कागदपत्रे शेतकऱ्यांच्या हवाली करणार आहे. यासाठी ७० शेतकऱ्यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले असून यासाठी रेल्वेचा पूर्ण डब्बा बुक करण्यात आला आहे.याबाबत बोलताना अमिताभचा प्रवक्ता म्हणाला, अमिताभने उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज चुकते केले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जही चुकते केले होते. निवडत ७० शेतकऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. त्यांना अमिताभ कर्ज फेडीची कागदपत्रे मूळ कागदपत्रे देणार आहेत.

Share.

Leave A Reply