ह्या कायद्या मुळे जुलै पासुन खाद्य तेलात होणार नाही भेसळ..!

0

सोयाबीन झेंडू यासारख्या महागड्या खाद्यतेलामध्ये यापुढे स्वस्त पाम आँयल ची भेसळ आता शक्य होणार नाही एवढेच. नव्हे तर वनस्पती डालड्या मध्ये सुद्धा आता जर पामोलीनची भेसळ करण्यात आली तर तसे त्याच्या वरती लिहावे लागणार आहे.

भेसळ रोखण्यासाठी बनवण्यात आलेला हा नियम जुलै 2019 पासून पूर्ण देशामध्ये लागू होणार आहे. भारतामध्ये चार वर्षे किमान दोन करोड खाद्य तेलाची विक्री होते. जेव्हा भारतामध्ये घरेलू उत्पादन जवळपास 65 लाख टन एवढेच आहे. यामुळेच आपल्याकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तेल आयात करावे लागते आणि सोबतच काही देशांना भारत तेल निर्यातही करतो.
2017 मध्ये 1.55 करोड टन खाद्यतेल भारतामध्ये आयात केलेले होते ज्यामध्ये 98% पामोलिन सोयाबीन आणि सूर्यमुखी तेल होते सूर्यमुखी तेल आणि सोयाबीन तेल हे भारताला 70 ते 90 रुपये प्रति लिटर या दराने खरेदी करावे लागते.

तर पामोलीन 40 ते 45 रुपये प्रति लिटर या दराने खरेदी करावे लागते. यामुळेच पामोलीन च्या भरोशावरच वनस्पती डालडा यासारखे अनेक उद्योग चालत आहेत. ह्या भेसळीच्या प्रकाराला थांबवण्यासाठी सरकारने ब्लेंडेड खाद्यतेल या प्रकारातील कंपन्यांना एक अधिसूचना जारी केलेली आहे. या अधिसूचनेमध्ये असे लिहिले आहे की या कंपन्यांना त्यांच्या उत्पादना बद्दल सर्व माहिती द्यावी लागणार आहे जर यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त भेसळ आढळून आली तर त्यांच्यावर सक्षम अधिकाऱ्यांच्या निवडी खाली समितीचे गठण करण्यात येईल.

ही समिती बद्दल चौकशी करून सरकारकडे आपला अहवाल सादर करेल. या नियमामुळे आता प्रत्येक भेसळ करणाऱ्या उत्पादकाला त्याच्या भेसळीच्या टक्केवारी बद्दल माहिती त्याच्या उत्पादनावर तीच द्यावी लागणार आहे. नेहमीच असे पाहन्यात येते की अश्या प्रकारचा नियम जर सरकारने बनवला तर पळवाट म्हनुन या गोष्टी लहान अक्षरामध्ये लिहीण्यात येतात.पन याव्येळी सरकारने असाही नियम बनवला आहे की भेसळीचे प्रमान दर्शवताना अक्षर हे 5 मिमि चे नसावे. सरकारच्या या नियमामुळे भेसळ करने आता अशक्य होनार आहे.

Share.

Leave A Reply