चक्क ५ लाखाची नोकरी सोडून हा युवक करत आहे यशस्वी शेती

0

पेशाने इंजिनियर असणारा हा युवक ५ लाख महिन्याची नौकरी सोडून चक्क शेती करतोय.
मित्रांनो इथे कोणाला हि विचार तुला काय व्हायचंय तर त्याच उत्तर डॉक्टर किंवा इंजिनियर हेच असेल असा एकही जण नसेल जो म्हणेल कि मला शेतकरी व्हायचंय ! त्याला कारणीभूत आहे आपली अर्थव्यवस्था ! असो तो विषय बाजूला… गोष्ट आहे सांगली येथील अवघ्या २७ वर्षीय तरुणाची, जो एक उत्तम संगणक अभियांत्रिकी आहे ज्याचा वार्षिक पगार तब्बल ५ लाख
एवढा असलेला.

अनुप पाटील हा युवक एकंदरीत रोजच्या नोकरी ला कंटाळलेला. ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी हे याला काय जमेनासे झाले. आणि म्हणून काही दिवस रजा घ्यावी या बहाण्याने त्याने नोकरी ला रामराम ठोकला ! आणि आपल्या गावी येऊन थांबला. जवळजवळ ३ महिने होत आली तरीही हा घरीच असल्यामुळे घरच्यांना हि नक्की काही कळेनासे झाले कि नक्की काय चालू आहे याच! मग शेवटी या अवलियाने शेती बद्दल माहिती गोळा केली काही उत्तम अशे शेतकरी असलेलेल्या शेतकरी बांधवांच्या भेटी घेतल्या. तसेच काही माहिती इंटरनेट वरूनही मिळवली. आणि मग निश्चित केलं कि आता आपल्याला शेती करायची.

आपल्या वडिलोपार्जित १२ एकर शेतीत याने निरनिराळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्यांचे पीक घेतले तसेच त्यात फुलशेतीची सुद्धा करण्याला सुरुवात केली. सुरुवातीला नवीन असल्याकारणाने थोडा तोटा सहन करावा लागला परंतु म्हणतात ना मेहनतीचं फळ मिळतचं !

त्याने नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केल्यामुळे बऱ्याच जणांनी त्याची खिल्ली सुद्धा उडवली परंतु या अवलियाने दुर्लक्ष केलं . आणि दाखवून दिल कि शेती सुद्धा उत्तम कमाई करवून देऊ शकते. अनुप पाटील हा युवक वर्षाकाठी तब्बल २० लाख रुपयांचं उत्पन्न काढतो.
आहे ना अमेझिंग !

Share.

Leave A Reply