20 एकरचा मालक ते वडाप ड्रायव्हर..!

0

तुकाराम हा खाणदाणी तरुण शेतकरी, गोरापन उंच छान व्यक्तीमत्व, ऊस, कापूस,सूर्यफुल, म्हैसी, मका असे चांगले उत्पन्न घेत होता. दरम्यान त्यांचा संपर्क एका जिल्हातील नेत्याशी आला. तुम्ही राजे आहेत आपच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष व्हा असे करून गळ घातली, खूप मोठे आमदार व्हाल असे म्हणून गाजर दाखविले. तुकाराम सर्व भुलतापला भुलला. खाजगीत पैसे उसने घेऊन तीन लाख पक्ष निधी दिला व तालुका अध्यक्ष्य झाला. अध्यक्ष म्हंटल्यावर गाडी पाहिजे. आता स्कॉर्पिओ तर कॉमन झाली, फॉरच्यूनर घ्या म्हणून कोणी सांगितले, 20 लाखचे कर्ज काढले गाडी घेतली.

khabar.ndtv.com

प्रेसिस खर्च, प्रवास यावर खूप खर्च होऊ लागला, सभा, टाळ्या पुढारी लोकांमध्ये उठणे बसने यांत तुकारामला व्यसन लागले होते.शेतावर लक्ष्य कमी आणि रोजनदार करणारे टाईमपास करुण घरी जाऊ लागली.आता सोसायटी मधून घेतलेले पिक कर्ज देखील फिटेना म्हणून एक एकर जमीन विकली तर कधी गाडीचा हफ्ता आला म्हणून जमीन विकली, असे करता करता 7 वर्षात 18 एकर जमीन संपवली फॉरच्युनरचा हफ्ता काही भरणे शक्य नसल्याने ति विकुन एक सेकंड हैन्ड बोलेरो विकत घेतली.नंतर पक्षात काही बदल झाल्या मुळे तुकारामला पदा वरुण खाली केले, शेवटी तुकाराम कड़े 2 एकर जमीन उरली त्यात काही तुकारामचा उदारनिर्वाह होईना, बोलेरो भाड़े तत्वावर देने सुरु केले. नंतर ड्रायव्हर पगार देने शक्य नसल्याने स्वतःच गाड़ी चालवु लागले.गाड़ी फारशी चांगली नसल्याने आता तिला दुरचे भाड़े देखील मिळत नसे, त्यामुळे 15किमी असलेला रूटवर वडापचे काम चालू केले. प्रत्येकी 10रु घेतो असे दिवसाला 300रु मिळत असे.सद्विवेक बुद्धि गहाण ठेवून भपकेबाज पपा करणे म्हणजे गरीब होण्याचा मार्ग आहे. उगाच लग्नसमारंभ मधे वाढीव खर्च, पुढारपन करत फिरने हे दारू, सिगरेट, गुटखा यांच्या पेक्षा भयानक व्यसन आहे. राजकारणाचा व मोठेपणा करणे हे मराठी माणसाला मटक्याचे लागलेले व्यसन आहे.

inkhabar.in

पोकळ दिखावा, बडा दिखावा पोकळ वासा अशी अवस्था झाली आहे. नाव फक्त मोठे राहिली आहे बाकि समाजाला परिस्थिती भिके कंगाल झाली आहे तरी सुध्या बडेजाव व भपकेपना जात नाही. यातून एकच बोध घ्यावा बडेजाव व भपकेपणा केला आणि आपल्या मूळ कामावर दुर्लक्ष्य केले तर, 5 वर्षात संपला म्हणून समजा. आता तुकाराम तालुक्याच्या स्टॅंड वर 10-10रु आवाज देतांना दिसून येतो. आम्हाला वाटते महाराष्ट्रातील प्रत्येक घरात रोजगार उभा राहवा असे वाटते. -प्रा प्रकाश भोसले

Share.

Leave A Reply