अबबब… 1 करोड़ किमतीचा साप..!

0

मांडूळ सर्पा विषयी ची माहीतीसवसामान्यांना माहीती असने गरजेचे आहे.. English:- John’s Earth Boa, IndianSand Boa Hindi:- Domuhi, Damoi Marathi:- Mandul मांडूळमांडूळ शेतकर्यांचा मित्र आहेगुप्तधनाचा शोधकअसल्याच्या अंधश्रद्धेपोटी व इतरगैरसमजुतींमुळे “मांडूळ’या बिनविषारी सापाची राज्यातबेसुमार तस्करी सुरू आहे.गेल्या काही वर्षांतया सापाची मोठ्या प्रमाणाततस्करी होत असल्यानेत्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माणझाला आहे.त्याच्या तस्करी आणि अंधश्रद्धेमुळेआजच्या शिक्षणाचा आपणचआपल्या हाताने केलेला पराभवम्हाणायला हवा.

वास्तविक जगात कुठेच दोनतोंडाचा साप नाही. त्याला गुप्तधनओळखता येत नाही. मात्रअंधश्रद्धेपोटी त्याच्याविषयी गैरसमजवाढले असून त्याची मोठ्या प्रमाणाततस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षातराज्यभरात मांडुळाच्या तस्करीची अनेकप्रकरणे उघडकीस आली आहेत. येत आहेत.जादूटोण्यासाठी मांडूळ सापाला प्रचंडमागणी आहे.. हा साप मिळावा म्हणूनकाही तांत्रिक -मांत्रिकत्याच्या सतत शोधात असतात.काही वेळा समोरची व्यक्ती सांगेलत्या पैशांना तो साप विकतघेतला जातो. सापाला दोन तोंडअसल्याच्या गैरसमजुतीमुळे त्याच्याविषयी अनेकअंधश्रद्धा पसरल्या आहेत.

Wikipedia.com

तो दोन्ही बाजूंनी चालू शकतो. अथवाहा साप उन्हात धरल्यावरत्याची सावली पडतनाही किंवा त्याला आरशासमोर धरलंतर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसतनाही.या सापाची पूजा केली की पैशांचा पाऊसपडतो अशा अनेक समजुती आहेत. ग्रामीणभागात सर्रास आढळणारा व उंदीरखाऊन उदरनिर्वाह करणारा हा सापअलीकडेपर्यंतकोणाच्या गणतीतही नव्हता. हा सापगुप्तधन मिळवून देतो, अशी चर्चा सुरूझाल्याने या अंधश्रद्धेपायी आजपर्यंतनिवांत फिरणाऱ्या मांडुळाच्या मागेमाणसांच्या टोळ्या हात धुऊन लागल्या.

या सर्पासाठी काही मंडळी काहीलाखांपर्यंत रक्कम मोजण्यास तयारआहेत. मांडुळाच्या खरेदी-विक्रीतूनमालामाल होण्यासाठी तस्करांनी पायपसरल्यानेया सर्पाविषयीची अंधश्रद्धा खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचा मित्रअसलेल्या मांडुळाच्या जिवावरउठली आहे.कथित गुप्तधनाच्या शोधासाठी मांडूळसापाचा वापर केला जातो. प्रत्यक्षातमांडुळाचा असा कोणताही उपयोग होतनाही. इलेक्ट्रिक करंट आहेकिंवा नाही हेतपासण्यासाठीचा “टेस्टर’ लावला तरयातील काही सापांना टेस्टरमधीललाइट लागतो, असा समज आहे.अशा लाइट लागणाऱ्या सापांना अधिककिंमत दिली जाते, असे सांगितले जाते.जेथे धन असते, त्याच्या जवळपासया सापाला आगळीवेगळी चकाकी येते,तसेच धनाच्या दिशेनेच हा साप सरपटतजातो.

wikipedia.com

जणू मार्गदर्शकाचेच कामतो करतो, असे समज पसरले आहेत.प्रत्यक्षात टेस्टर लावल्यानंतर लाइटलागणारा असा साप अद्यापकोणालाही पाहायला मिळालेला नाही. हा साप दुर्मिळ किंवा गुप्तधनशोधणारा असल्याचे भासवण्यात येतअसल्याने या सापाची किंमत काही लाखरुपयांपर्यंत जाते, अशी धक्कादायकमाहिती पुढे येत आहे. मांडुळाचे वजनकिती यावरही त्याचा दर ठरतो. दोनकिलोपेक्षा जादा वजनाचे सापचगुप्तधनापर्यंत नेतात, अशी आणखी एकउपअंधश्रद्धा आहे.हा साप वन्य जीव संरक्षणकायदा 1972 नुसार शेड्यूल चारमध्येसमाविष्ट करण्यात आला आहे. या सापाच्या चावण्यानेव्यक्तीला कुष्ठरोग होतो, अशी एकगैरसमजूत या सापाबद्दल रूढ होती. या समजुतीमुळेही ग्रामीण भागातत्याच्या वाट्याला कोणी जात नसेआणि अनायासे या सापाला संरक्षणमिळत असे. पण आता मात्र अंधश्रद्धा,गैरसमजुती व वास्तुशास्त्रातील उपयोगामुळेया सापाला वाढती मागणी आहे. हा साप घरात विशिष्टदिशेला पाळल्यास धन-संपत्ती मिळते,अशी गैरसमजूत आहे. काही भोंदू लोकसापाचा उपयोग कथितकाळ्या जादूसाठी करतात. आर्थिकगुंतवणुकीची अधिक क्षमता बाळगूनअसणारे, मुख्यत: बांधकाम व्यवसायातीललोक मोठ्या प्रमाणातया सापाची खरेदी करतात.

पुढेत्याला अधिककिमतीला दुसऱ्याला विकले जाते.मांडूळ म्हणजे काय? “हेड सॅंड बोआ’ या इंग्रजी नावानेओळखल्या जाणाऱ्या या सर्पाची आपल्याभागात मांडूळ किंवा दुतोंड्या अशी ओळखरूढ आहे. मऊ मातीमध्ये हा सापस्वत:ला गाडून घेतो. पावसाळ्यातत्याचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिकअसते. दिसायला अजगराप्रमाणेअसणारा मांडूळ हा साप पूर्णपणेबिनविषारी, निरुपद्रवी व मंदहालचाल करणारा आहे. तो रंगानेपिवळसर, काळसर, तपकिरी व तांबूसअसतो. तोंडाच्या आणि शेपटीच्या भागाचेआकारमान जवळपास एकसारखे असते. त्यामुळे नेमके तोंड व शेपटी कुणीकडे हेकळत नाही. या सापाने जीभ बाहेरकाढल्यानंतरच ही बाब कळते.या वैशिष्ट्यामुळेचत्याला “दुतोंड्या’म्हणतात. सरडे, पक्षी, घुशी, उंदीर वअन्य सर्व याचे खाद्य आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यानया सापाची मादी सहा ते सातपिलांना जन्म देते. मांडूळ सापांचे रक्षण करामांडूळ हा साप निरुपद्रवी असून,शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. उंदरांचेमोठ्या प्रमाणावर भक्षण करूनत्यांची संख्या तो नियंत्रणात ठेवतो. हा साप दुतोंडी असल्याचा गैरसमज आहे. त्यामुळे जमिनीतील गुप्तधन, मटक्याचेआकडे, गुदद्वारातूननिघणाऱ्या द्रवापासून सेक्स टॉनिकतयार होते, अशा अनेक गैरसमजुतीमुळेसंबंधित लोक मोठ्या प्रमाणावर किंमतदेण्यास तयार होतात. यामुळे सर्वत्रया सापांचा शोध घेऊन वरीलकामांसाठी त्याचा उपयोग केला जातो. मात्र, यात सापाचा जीवजाण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे मांडूळ सापांचे रक्षणकरण्यासाठी प्रत्येकाने पुढेयेण्याची गरज आहे.

Share.

Leave A Reply